
Read Time:1 Minute, 1 Second
औरंगाबाद : जिल्ह्यात आज 16 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने जिल्ह्यात आढळलेल्या कोरोनाबाधितांची एकूण संख्या 1301 झाली आहे, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.
औरंगाबादमध्ये आज आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे. सुभाषचंद्र बोस नगर, एन 11, हडको (4), भवानी नगर (2), रोशन गेट (1), हुसेन कॉलनी (1), बायजीपुरा (1), इटखेडा, पैठण रोड (1), अल्तमश कॉलनी (1), जवाहर नगर, गारखेडा परिसर (1), शाह बाजार (1), मयूर नगर, एन-6, सिडको (1), राम नगर, एन 2 (1), गजानन मंदिर परिसर (1) या भागातील कोरोनाबाधित आहेत. यामध्ये 10 महिला आणि सहा पुरूष रुग्णांचा समावेश आहे.