
महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ संचालित सोमय्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिवस मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्ध पद्धतीने साजरा करण्यात आला,कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली.
तसेच या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून योग शिक्षिका शिवानी रामटेके उपस्थित होत्या. त्यांनी विद्यार्थ्यांकडून विविध योगासने व प्रात्यक्षिके करून घेतली आणि योगाचे आरोग्यदायी महत्त्व पटवून दिले.
या वेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. ए. गाडगे यांनी उपस्थितांना संबोधित करताना सांगितले की, योगाला आपल्या दैनंदिन जीवन शैलीचा भाग बनवा,योगामुळे शारीरिक व मानसिक आरोग्य चांगले राहते,विधार्थानी दररोज योगा करायला पाहिजे योगामुळे मानसिक स्थर्य लाभते व मनात साकारत्मक विचार निर्माण होते. प्रात्यक्षिक सत्रात त्यांनी मान, खांदे, कंबर, गुडघे आदींचे सूक्ष्म व्यायाम, तसेच प्राणायाम, अनुलोम-विलोम, फुफ्फुसासाठी विशेष व्यायाम आणि सूर्यनमस्कार यांचे सखोल मार्गदर्शन केले.
तसेच “योग ही भारताने जगाला दिलेली अमूल्य देणगी असून, कोरोना काळात नियमित योगसाधनेमुळे अनेकांचे आरोग्य टिकून राहिले. आज संपूर्ण जग योगाचे महत्त्व मान्य करत आहे.”
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नूतन भोयर यांनी तर आभार प्रदर्शन सानिया कांबळे यांनी केले. त्यांनी आपल्या आभार प्रदर्शनात प्रमुख पाहुणे शिवानी रामटेके, प्राचार्य डॉ. पी. ए. गाडगे, सोमय्या ग्रुपचे अध्यक्ष श्री. पी. एस. आंबटकर, उपाध्यक्ष श्री. पियुष आंबटकर, संचालिका सौ. अंकिता आंबटकर, तसेच सर्व विभाग प्रमुख, प्राध्यापकगण आणि शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांचे विशेष उल्लेख करून मनःपूर्वक आभार मानले.
कार्यक्रमाचे आयोजन प्रा. डॉ.उज्वला सावरकर आणि क्रीडा शिक्षक श्री. सचिन चापले यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशासन, शिक्षण व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग, तसेच विद्यार्थीनी परिश्रमपूर्वक सहभाग नोंदवला, त्यांचेही विशेष आभार व्यक्त करण्यात आले.

https://shorturl.fm/3iFXj
https://shorturl.fm/l5Zxq
https://shorturl.fm/sCVne
https://shorturl.fm/ZmETN
https://shorturl.fm/Tr8UG
https://shorturl.fm/HAnZY