सोमय्या पॉलीटेक्नीकच्या विध्यार्थाने ” व्हेटलिफ्टिंग ” स्पर्धेत सुयश
महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ व IEDSSA अंर्तगत विभागीय व्हेटलिफ्टिंग स्पर्धेत सोमय्या पॉलीटेक्नीकचे विध्यार्थाने यश प्राप्त केले,हि स्पर्धा नागपूर विभागीय अंर्तगत जी. एच.रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनेरींग,नागपूर येथे आयोजित केले गेले होते. विध्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव मिळावा तसेच जीवनातील खेळाचे महत्व लक्षात घेऊन विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात येते.
या स्पर्धेत सुजल लेंडांगे मायनींग द्वितीय वर्षांतील विध्यार्थाने ८५ किलो वजन गटात प्रथम क्रमांक प्राप्त केला,तसेच राजकुमार कदम संगणक विभागातील ६२ किलो वजन गटात दुसरा क्रमांक प्राप्त करून सोमय्या पॉलीटेक्नीकचे नाव उंचाविले आहे,विध्यार्थी विविध प्रकारच्या यश प्राप्त करीत आहे.
आपल्या यशाचे श्रेय संस्थेचे संस्थापक श्री. पी. एस. आंबटकर, सचिव सौ.प्रीती पांडुरंगजी आंबटकर,उपाध्यक्ष श्री. पियुष आंबटकर, डायरेक्टर सौ.अंकिता पियुष आंबटकर, प्राचार्य श्री.जमीर शेख सर, उपप्राचार्य श्री.दीपक मस्के सर यांना दिले, आणि त्यांच्या या यशाबद्धल सर्वत्र कौतुक होत असून शिक्षक व शिक्षकेत्तरी कर्मचाऱ्यांना अभिनंदन केले.
या स्पर्धेचे भार सांभाळणारे क्रीडा प्रमुख प्रा. कमलेश ठाकरे,टीम मॅनेजर प्रा.प्रकाश सोनडवले यांनी केले.