सोमय्या ग्रुप मध्ये श्री.राम नवमी उत्साहात साजरा
महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित सोमय्या ग्रुप अंतर्गत श्री.राम नवमी उत्साहात साजरा करण्यात आले,या कार्यक्रमाकरिता प्रमुख पाहुणे संस्थेचे अध्यक्ष श्री. पी.एस. आंबटकर, प्राचार्य श्री. जमीर शेख, उपप्राचार्य श्री.दीपक मस्के ,रजिस्ट्रार श्री.बिसन सर उपस्थित होते, प्रा. खुजे सर ,प्रा. राजकुमार सर, मंचावर उपस्थित होते, सुरुवातीला श्री.रामच्या प्रतिमेला माल्यार्पण व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
हा दिवस रामनवमीच्या रूपात भगवान श्रीरामाचा जन्मोत्सव म्हणून साजरा केला जातो. मॅकरून स्टूडन्ट अकॅडमी वडगाव ह्या विध्यार्थानी सहभाग नोंदविला तसेच त्यांनी भगवा शेरवानी परिधान केला होता, सोमय्या पारंगणात भगवे झेंडे,रांगोळी,दिवे,लावून जोरदार सजावट केली होती. गजरात विध्यार्थी राममय होऊन ”जय श्री राम” चा नारा लावण्यात आले.
सदर कार्यक्रमाप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष श्री. पी.एस. आंबटकर यांनी विध्यार्थाना मार्गदर्शन केले, राम नवमीच्या महत्त्वाबद्दल पौराणिक मान्यता आहेत. चैत्र शुक्ल नवमीच्या दिवशी अयोध्येत राजा दशरथाच्या घरी माता कौशल्याच्या पोटी विष्णू अवतार श्रीरामांचा जन्म झाला. तेव्हापासून हा दिवस रामनवमीच्या रूपात भगवान श्रीरामाचा जन्मोत्सव म्हणून साजरा केला जातो, सुख आणि समृद्धी वाढते आणि माता लक्ष्मी प्रसन्न होते. माता सीतेला लक्ष्मी स्वरूप मानले आहे.
कार्यक्रमासाठी सर्व विभागप्रमुख आणि शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.तसेच प्रा.नवशाद सिद्धकी सूत्र संचालन केले.