महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित सोमय्या आयुर्वेदिक कॉलेज आणि हॉस्पिटल भद्रावती येथे फ्रेशर्स पार्टीचे आयोजन करण्यात आले , सर्व प्रथम संस्थेचे संस्थापक श्री. पी. एस. आंबटकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून धन्वंतरी आयुर्वेदिक दैवताला माल्यार्पण करीत कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आले. संस्थेचे संस्थापक श्री. पी. एस. आंबटकर, सचिव सौ.प्रीती पांडुरंगजी आंबटकर, व्यवस्थापक डॉ.पायल पी.आंबटकर, प्राचार्य डॉ.प्रीती साहू, प्रा.राजदा सिद्दीकी, प्रा.अनिल खुजे, प्रा.डॉ.जगदीश गंपूरवार ,प्रा.प्रकाश पिंपळकर सर मंचावर उपस्थित होते.
तसेच फॅशन शो,डान्स शो,रॅम वॉक,गायन स्पर्धा विविध कार्यक्रमात विधार्थांचा सहभाग नोंदविला होता, तसेच यात महाविद्यलयाचे सन २०२४-२०२५ मिस फ्रेशर दीक्षा गहाणे तर मिस्टर फ्रेशर म्हणून गजानन लटपटे यांची निवड करण्यात आली.
प्रमुख मान्यवरानी विध्यार्थाना मार्गदर्शन करीत असताना तुम्हाला आनंद आणि समृद्धी देओ, नवीन सकाळ, नवीन अशा, यश, नवीन योजना, तसेच नवीन वर्ष हे सुखमय जाओ, नव्या उमेदीने झेप घेऊन नवं वर्षाचे स्वागत केले, तसेच त्यांनी विध्यार्थाना आपल्या कर्तव्याची जाणीव करून दिली व उज्वल भविष्यबद्धल शुभेच्या दिल्या, यशावर आणि प्रगतीवर प्रतिबिंबित करण्याची आणि भविष्यासाठी उद्दिष्टे निश्चित करण्याची ही संधी असते, शिक्षकांचे मार्गदर्शन यातून आपल्या उज्ज्वल भविष्याची सुरुवात होते. आजचा दिवस आपल्या आयुष्यातील सर्वात अविस्मरणीय दिवस आहे, मनोबल वाढवण्यासाठी, समुदायाची भावना वाढवण्यासाठी आणि ध्येयाप्रती बांधिलकी मजबूत करण्यासाठी हे एक शक्तिशाली साधन आहे तसेच विध्यार्थानी आपल्या कलागुणाचे प्रदर्शन करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
शिक्षकांनी नव्या संकल्पना, आपले ध्येय पूर्ण करण्याची नव्या जुन्या आठवणी सांगत विचार मांडले.
विधार्थिनीं गायत्री दांडेकर व आभार प्रदर्शन यश टिपणावार यांनी केले,या कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरिता प्रा.राझदा सिद्धकी यांनी परिपूर्ण यॊगदान दिले,तसेच डॉक्टर आणि सिस्टर कर्मचारी उपस्थीत होते .