महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित सोमय्या इन्स्टिट्यूट ऑफ टेकनॉलॉजि चंद्रपूर कॉलेजच्या प्रथम वर्षातील बी.टेक. विद्यार्थ्यांसाठी संस्था स्तरावर CIPET, (महाराष्ट्र इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन) ताडाली चंद्रपूर येथे औदयोगिक भेट दिली.
मान्यवरानी श्री.अवनीत कुमार जोशी डायरेक्टर अँड हेड, शरथ पिटी , टेकनिकल ऑफिसर पुष्कर देशमुख यांनी विध्यार्थाना टूल रूम,सीएनसी मशीन्सच्या संपर्कात येणे, सीएनसी ३ अॅक्सिस मिलिंग मशीन,सीएनसी लेथ मशीन,सीएनसी ईडीएम मशीन,सीएनसी वायर कट
प्रक्रिया ,विभागात प्लास्टिक प्रोसेसिंग मशीन्सच्या संपर्कात येणे.
ह्याबद्दल विध्यार्थाना माहिती दिली,विद्यार्थ्यांना उद्योगाचे काम, मशीन कशी काम करतात, कामगारांना किती वेळ लागतो, प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी किती वेळ लागतो, हे शिकण्यासाठी औद्योगिक भेट घेतल्या गेली.
तसेच सोमय्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे प्राचार्य डॉ. पी. ए. गाडगे , उपप्राचार्य ए. आर. खुजे , प्रा .निर्जला बोनगिलवार ,प्रा.आशिष देहरकर आणि प्रा. कल्याणी कडूकर, प्रा. उज्जला सावरकर, प्रा.जयश्री आसुटकर उपस्थित होते.