सोमय्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कॉलेज येथे महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती

महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळाद्वारे संचालित सोमय्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, चंद्रपूर येथे महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती अत्यंत उत्साहात व अभिमानाने साजरी करण्यात आली.

या कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे संस्थापक मा. पी. एस. आंबटकर आणि उपाध्यक्ष पीयूष आंबटकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संचालक सौ. अंकिता पीयूष आंबटकर होत्या. यावेळी प्राचार्य डॉ. पी. ए. गाडगे यांनी डॉ. आंबेडकर यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वावर प्रकाश टाकत त्यांच्या जीवनातील प्रेरणादायी घटनांचा उल्लेख केला. उपप्राचार्य अनिल खुजे यांचीही प्रमुख उपस्थिती होती,कार्यक्रमाची सुरुवात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व अभिवादन करून करण्यात आली. जयंतीनिमित्त महाविद्यालयात विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा व भाषण स्पर्धा घेण्यात आल्या.

भाषण स्पर्धेत प्रथम क्रमांक – साहिल चांदेकर, द्वितीय क्रमांक ,किमाया चुनरकर, तृतीय क्रमांक  निशा रेड्डी  तसेच निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक – शुभांगी रामटेके, द्वितीय क्रमांक – दिव्या भगत, तृतीय क्रमांक किमाया चुनरकर, चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांक – सुमन कुमार निशा रेड्डी , द्वितीय क्रमांक – प्रबुद्धा तेलंग , तृतीय क्रमांक – निशा रेड्डी

या सर्व विजेत्या विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष पी. एस. आंबटकर आणि उपस्थित मान्यवरांनी अभिनंदन केले व त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

 

कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन स्मृती नकले यांनी केले तर डॉ. उज्वला सावरकर यांनी उपस्थितांचे आभार मानले. या कार्यक्रमाला सोमय्या पॉलीटेक्नीक कॉलेज प्राचार्य श्री.जमीर शेख ,उपप्राचार्य दीपक मस्के , प्रा. मोजेस, प्रा.धनश्री कोटकर महाविद्यालयातील  प्राध्यापकवर्ग, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम संपूर्णपणे श्रद्धा, सन्मान व प्रेरणादायी वातावरणात पार पडला,

या सर्व विजेत्या विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष पी. एस. आंबटकर आणि उपस्थित मान्यवरांनी अभिनंदन केले व त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

 

Previous post मॅकॅरून स्टुडन्ट अकॅडमि भद्रावती येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी
Next post सोमय्या पॉलीटेक्नीक येथे महाराष्ट्र दिन साजरा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Chief Editor

Shri. P. S. Ambatkar

Chief Editor - Daily Deshanayak News