सोमय्या पॉलीटेक्नीक येथे विध्यार्थ्यांसाठी सायबर विश्वातील गुन्हेगारी आणि पोक्सो (Pocso) कायदा विषयी मार्गदर्शन
महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित सोमय्या पॉलीटेक्नीक येथे १९ मार्च २०२४ ला विध्यार्थ्यांसाठी सायबर विश्वातील गुन्हेगारी आणि pocso कायदा या विषयावर सेमिनारचे आयोजन करण्यात आले होते ,त्यामध्ये प्रमुख पाहुणे श्री.सुमित विजयकुमार जोशी सर सचिव ज़िल्हा विधी सेवा प्राधिकरण चंद्रपूर तथा दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्थर आणि अतिरिक्त्त मुख्या न्यायदंडाधिकारी चंद्रपूर, श्री. महेश इटेकर सर सायबर पोलीस स्टेशन इन्चार्ज , तसेच श्री.मुजावर युसूफ अली हायजेनि प्रॅक्टिसनर सायबर पोलीस स्टेशन चंद्रपूर यांनी विध्यार्थ्यांना प्रभावीपणे मार्गदर्शन केले.
तसेच खोटी प्रोफाइल तयार करून अनेकांना अश्लील संदेश, चित्रे पाठवणे, अकाउंट हॅक करणे, चॅटिंग करताना फसवणे, व्यक्तीला लग्नाच्या जाळ्यात अडकवणे, लैंगिक चाळे करणे, भेटायला बोलावून फसवणूक करणे यासारख्या गंभीर प्रकारांचा सायबर गुन्ह्यांमध्ये समावेश होतो. संगणकाचा उपयोग हा दुधारी शस्त्राप्रमाणे केला जातो, सायबर क्राइम हा गुन्हाचा एक प्रकार आहे, सायबर क्राइम हा असा गुन्हा आहे ज्यामध्ये संगणक आणि नेटवर्कचा समावेश असतो,जागतिक स्तरावर सायबर गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी सहसा भागीदारीची आवश्यकता असते. सायबर गुन्ह्याची चौकशी कायद्याची अंमलबजावणी, होमलँड सिक्युरिटी विभाग, इतर फेडरल एजन्सींद्वारे केली जाऊ शकते. तथापि, जसजसे जग तंत्रज्ञानावर अधिक अवलंबून आहे, सायबर हल्ले आणि सायबर गुन्ह्यांचा विस्तार होणार आहे कारण धोक्याचे कलाकार संरक्षणातील कमकुवतपणा आणि विद्यमान असुरक्षा यांचा उपयोग करून त्यांचे अंतिम उद्दिष्ट साध्य करण्यासाठी चालू ठेवतील.
तसेच pocso कायद्यातील महत्त्वाच्या गोष्टी पिडीत बालकाचे/बालिकेचे नाव उघड केले जात नाही, तक्रार नोंदवून घेण्यासाठी पोलीस पिडीत व्यक्तीच्या घरी साध्या वेशात जातात. शक्यतो महिला पोलीस अधिकारी हे निवेदन नोंदवून घेतात,सुनावणीच्या दरम्यान फिर्यादी आणि आरोपी समोरासमोर येणार नाहीत याची काळजी घेतली जाते,न्यायालयात खटला दाखल केल्यावर ‘इन कॅमेरा’ साक्ष नोंदवली जाते,कोणत्याही कारणासाठी कोणत्याही बालकाला रात्री पोलीस ठाण्यात थांबवून घेतले जात नाही,पिडीत बालकाची वैद्यकीय तपासणी पालकांच्या किंवा बालकाचा विश्वास असलेल्या प्रौढाच्या उपस्थितीत केली जाते, तसेच अशाप्रकारे या विषयावर प्रकाश टाकला,तसेच प्रत्येक विभागातील विधार्थांनी उस्फुर्त सहभाग घेतला होता, विधार्थांना मौलाची माहिती दिली आणि काळजी घेण्यास सांगितले.
सदर सेमिनारमध्ये संस्थचे उपाध्यक्ष श्री. पियुष आंबटकर सर, डायरेक्टर सौ.अंकिता पी.आंबटकर मॅडम, प्राचार्य श्री.जमीर शेख सर, उपप्राचार्य श्री.दीपक मस्के सर उपस्थित होते.
तसेच विभागप्रमुख , शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा.नौशाद सिद्धकी यांनी केले.