महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळाद्वारे संचालित सोमय्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, वडगाव चंद्रपूर येथे २० मे २०२५ रोजी सकाळी १० वाजता श्री. जय भारत चौधरी यांचे चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. जय भारत चौधरी हे मूळ चे बल्लारपूर, चंद्रपूरचे आहेत आणि ते स्कॉटलँडमधील जगप्रसिद्ध एडीनबर्ग विद्यापीठातून असमानता आणि समाज या विषयावर पदव्यूत्तर पदवी पूर्ण केले आहे. या चर्चासत्राचे आयोजन बी. टेक. प्रथम वर्षाचे विद्याथी साहिल चांदेकर, सार्थक गोंगले, किमया चुनारकर, प्रांजली नागपुरे, प्रकाशित बुजाडे, आर्या मेश्राम, संस्कुर्ती बोगावर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साक्षी बिजलपुरे आणि आभार प्रदर्शन राशी मोहुर्ले यांनी केले.
श्री.जय भारत चौधरी यांनी विद्यार्थ्यांना भारत आणि परदेशातील शिक्षणपद्धतींमधील मूलभूत फरक, शिष्यवृत्तीच्या संधी, आणि जागतिक दर्जाच्या शिक्षणाचा अनुभव याविषयी सखोल मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले की, “खरी शिक्षणपद्धती ही विद्यार्थ्यांना कठीण प्रश्न विचारण्याची क्षमता देते.” त्यांनी या विचाराचा विस्तार करताना असे नमूद केले की, केवळ माहिती प्राप्त करणे हे शिक्षणाचे अंतिम उद्दिष्ट नाही, तर विचारशक्तीला धार देणे, प्रश्न विचारण्याची आणि नव्या दृष्टीकोनातून समस्यांकडे पाहण्याची सवय लावणे हे खरे शिक्षण आहे. त्यांनी सांगितले की, आजच्या जागतिक स्पर्धेत यशस्वी होण्यासाठी फक्त पुस्तकी ज्ञान पुरेसे नाही, तर आत्मचिंतन, तर्कशुद्ध विचार, आणि सामाजिक भान यांची जोड आवश्यक आहे. त्यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले की, “शिक्षणाचे खरे मूल्य हे केवळ परीक्षेतील गुणांमध्ये नसून, आपण समाजात बदल घडवू शकतो का, हे महत्त्वाचे आहे.” त्यांनी त्याच्या जीवन प्रवासातून विद्याथ्यांना प्रेरित केले यावेळी सोमय्या ग्रुपचे अध्यक्ष पी. एस. आंबटकर , उपाध्यक्ष पियुष आंबटकर, संचालक अंकिता आंबटकर , प्राचार्य डॉ. पदमनाभ ए. गाडगे सरानी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन सहायक प्राध्यापक स्मृती एस. नकले यांनी केले.
या कार्यक्रमाला विध्यार्थी आणि शिक्षक वृंद उपस्थित होते.