महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित सोमय्या ग्रुप वडगाव येथे शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली, यामध्ये संस्थेचे संस्थापक श्री. पी. एस. आंबटकर, प्राचार्य श्री.जमीर शेख,उपप्राचार्य दीपक मस्के, सोमय्या डिप्लोमा इन फार्मसीचे प्राचार्य श्री. मोझेस दुर्गवाड, सोमय्या इन्स्टिट्यूट ऑफ टेकनॉलॉजि कॉलेजचे प्राचार्य डॉ.पद्मनाम गाडगे,उपप्राचार्य अनिल खुजे, सोमय्या प्राव्हेट आय.टी.आय प्राचार्य अमित जोगी,रजिस्टार श्री.बिसन सर उपस्तित होते.
सर्वप्रथम श्री.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आले, संस्थेचे संस्थापक श्री. पी. एस. आंबटकर यांनी “जय भवानी,जय शिवाजी” असे बोलत छत्रपती शिवाजी महाराजांविषयी माहिती देत त्यांच्या कर्तृत्वाची जाणीव करून दिली, छत्रपती शिवाजी महाराज म्हणून प्रसिद्ध, हे एक भारतीय राजे आणि हिंदवी स्वराज किंवा मराठा साम्राज्याचे संस्थापक होते. रयतेच्या हिताचा कारभार कसा असावा याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेला राज्यकारभार अशी आज्ञा देणारा इतिहासातील पहिला राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज परकीय आणि रावकीय अशा जुलमी सत्ताधीशाशी वतनदारांशी अनेक लढाया, युद्धे लढून या महाराष्ट्र भूमीत स्वराज्याची निर्मिती केली. जुलमी राजवटी संपुष्टात आणण्यासाठी सर्व जाती धर्माच्या अठरापगड बारा बलुतेदार जीवाभावाचे मावळे एकत्र करून हा लढा दिला जनतेसाठी कसे राज्य करावे याचा आदर्श निर्माण केला आपल्या राज्यातील जनतेसाठी शेतकऱ्यांसाठी अनेक वट हुकूम काढले मराठी भाषेतून राज्यकारभार चालवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्यभाषा व्यवहार कोश तयार केला होता या ग्रंथामध्ये फारसी शब्दांच्या संदर्भासाठी संस्कृत शब्द दिलेले आहेत या ग्रंथाद्वारे महाराजांनी व्यवहाराचे मराठीकरण करण्याच्या प्रयत्न केला.
तसेच विविध मान्यवरांचे भाषण आणि व्याख्याने झाली त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचेच नव्हे तर अखिल भारत वर्षाचे प्रेरणास्थान आहेत राष्ट्र निर्माता असलेल्या या महापुरुषांच्या लोककल्याणकारी स्वराज्यातील महत्वाचा दिन होय हे रयतेचे राज्य शाश्वत चिरंतन राहावे म्हणून या दिवशी रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक झाला होता व शिवाजी महाराज छत्रपती झाले होते या दिवशी स्वराज्याचे स्वर व त्व दुर्ग रायगडाच्या राज सदरेवरून घोषित झाले
या कार्यक्रमाला सर्व विभाग प्रमुख सर्व शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विधार्थिनी उस्फुर्तपणे सहभाग घेऊन जल्लोषात शिवजगार केले ,सूत्रसंचालन प्रा.बोबडे सर यांनी केले.