मॅकॅरून स्टुडन्ट अकॅडमि भद्रावती येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी

महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित मॅकरून स्टुडन्ट अकॅडमी भद्रावती येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती करण्यात आली. प्राचार्य राजदा सिद्धकी , डीफार्म चे प्राचार्य श्री.जगदीश सर, आयटीआय चे प्राचार्य श्री.पिंपळकर सर मंचावर उपस्थित होते. सर्वप्रथम भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करून अत्यंत उत्साहात व अभिमानाने साजरी करण्यात आली.

यावेळी प्राचार्य राजदा सिद्धकी यांनी डॉ. आंबेडकर यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वावर प्रकाश टाकत त्यांच्या जीवनातील प्रेरणादायी घटनांचा उल्लेख केला.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा संविधान निर्मिती मागचा उद्देश देशातील जातीपातीच्या भेदभाव आणि अस्पृश्यतेला मुळापासून नष्ट करणे व अस्पृश्यता मुक्त समाजाची निर्मिती करून समाजात क्रांती आणणे हा होता. सोबतच सर्वाना समानतेचा अधिकार देणे हा होता. तसेच त्यांनी भारत संविधानाने भारतातील सर्व नागरिकांना धर्माच्या स्वतंत्रतेचा अधिकार दिला, अस्पृश्यतेला मुळापासून नष्ट केले, महिलांना अधिकार मिळवून दिले, समाजातील वेगवेगळ्या वर्गामध्ये पसरलेल्या अंतराला संपवलं.

देशाला सामाजिक, आर्थिक, राजनीतिक, शैक्षणिक, धार्मिक, एतेहासिक, सांस्कृतिक, साहित्यिक, ओद्योगिक, संविधानिक, सह  वेगवेगळ्या क्षेत्रात अनेक काम करून राष्ट्राच्या निर्माणात अमूल्य योगदान दिले.

या कार्यक्रमाला शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Previous post सोमय्या  ग्रुप येथे  डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी
Next post सोमय्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कॉलेज येथे महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती

Chief Editor

Shri. P. S. Ambatkar

Chief Editor - Daily Deshanayak News