महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित सोमय्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजि कॉलेज चंद्रपूर येथे जल दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला,या कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन करून करण्यात आले,त्यानंतर सोमय्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजिचे प्राचार्य डॉ. पी. ए. गाडगे यांचे स्वागत सहाय्यक प्रा. आशिष देहरकर यांनी केले , प्रा. ए. आर. खुजे यांचे स्वागत सहाय्यक प्रा. कल्याणी कडूकर यांनी केले तसेच प्रा.डॉ. उज्वला सावरकर उपस्थित होते.
आपल्या भाषणातून डॉ. पी. ए. गाडगे सरांनी जागतिक जल दिन दरवर्षी २२ मार्च रोजी साजरा केला जातो , पाण्याचे महत्त्व आणि जलस्रोतांचे व्यवस्थापन याबद्दल जागरूकतां वाढवणे हा या दिवसाचे महत्त्व अधोरेखित केले,जागतिक जल दिनाचे काही महत्त्वाचे मुद्दे विध्यार्थाना पटवून सांगण्यात आले.
या कार्यक्रमाला सर्व विभाग प्रमुख आणि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.