गौरव कर्तृत्वाचा……. सौ.अंकिता पियुष आंबटकर याना ” शक्तिशाली महिला विदर्भ २०२५ पुरस्कारांनी ”सन्मानित

                                                   महिला दिनानिमित्त रायसोनी शिक्षण द्वारा संचालित विदर्भात कार्यक्रमाचे आयोजित केलेल्या “शक्तिशाली महिला पुरस्कार २०२५” मध्ये त्यांच्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महिलांचा  उत्सव साजरा करण्यात आला ,त्यामध्ये सोमय्या ग्रुपच्या संचालिका सौ.अंकिता पियुष आंबटकर याना ” शक्तिशाली महिला विदर्भ २०२५” पुरस्कार अभिनेत्री प्राजक्ता माळी यांचा हस्ते देण्यात आले .

 

                                                  महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ (एमएसपीएम) सोमय्या ग्रुपच्या संचालिका सौ.अंकिता पियुष आंबटकर मूळच्या नागपूरच्या त्याचे प्राथमीक शिक्षण नागपुरात झाले, संगणक तंत्रज्ञानात बीई आणि पुण्याहून मार्केटिंगमध्ये एमबीए, डेलॉइट, हैदराबाद येथील आघाडीच्या आयटी कंपनीत अडीच वर्षांचा नोकरीचा अनुभव आहे,तसेच लग्नानंतर संस्थापक श्री.पांडुरंग आंबटकर यांच्या मार्गदर्शनात तसेच पती श्री.पियुष पी.आंबटकर यांच्या सोबतीने सौ.अंकिता पियुष आंबटकर संस्थेचे कामकाज उत्तमरीत्या सांभाळत आहे,  एमएसपीएम ग्रुपच्या संचालक म्हणून संस्थेत सामील झाल्या आणि अभ्यासक्रमात अधिक अभ्यासक्रमेतर उपक्रम समाविष्ट करून मोठ्या प्रमाणात योगदान दिले आहे ज्यामुळे विद्यार्थ्यांना ३६०° मूल्यांकन आणि सर्वांगीण विकासासाठी अधिक विश्वासार्हता मिळाली आहे.

                                           सौ.अंकिता पियुष आंबटकर ह्या सामील झाल्यापासून संस्थांच्या बाबतीत ग्रुपने स्वतःची संख्या १३ वरून २३ पर्यंत दुप्पट केली आहे.

                                          अभियांत्रिकी आणि बीएएमएस कॉलेज असण्याचे स्वप्न आधीच पूर्ण झाले आहे. सर्व संस्था हुशारीने चालवणे, सर्व विद्यार्थ्यांना सर्वोत्तम पायाभूत सुविधा आणि शिक्षण देणे आणि अभ्यासासोबतच अभ्यासक्रमेतर उपक्रम देखील प्रदान करणे आणि भविष्यात एमबीए तसेच एमबीबीएस सारखी काही महाविद्यालये यादीत समाविष्ट करणे हे आमचे ध्येय आहे ,जेणेकरून केजी ते पीजी पर्यंत सर्व काही शिक्षण उद्याचे भविष्य बनणाऱ्या आपल्या मुलांसाठी उपलब्ध असेल यांनी संस्थेच्या विस्तारासाठी झटत आहे.

                                       तसेच संस्थेत विध्यार्थांची संख्या वाढली, विध्यार्थांनसाठी शैक्षणिक टूर त्यांनी सुरु केले त्यामुळे विधार्थांच्या ज्ञानात मोठा भर पडला आहे.

 

Previous post सोमय्या ग्रुप मध्ये श्री.राम नवमी उत्साहात साजरा
Next post सोमय्या  ग्रुप येथे  डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी

One thought on “गौरव कर्तृत्वाचा……. सौ.अंकिता पियुष आंबटकर याना ” शक्तिशाली महिला विदर्भ २०२५ पुरस्कारांनी ”सन्मानित

  1. Этот интересный отчет представляет собой сборник полезных фактов, касающихся актуальных тем. Мы проанализируем данные, чтобы вы могли сделать обоснованные выводы. Читайте, чтобы узнать больше о последних трендах и значимых событиях!
    Исследовать вопрос подробнее – https://vivod-iz-zapoya-2.ru/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Chief Editor

Shri. P. S. Ambatkar

Chief Editor - Daily Deshanayak News