कबड्डी सामन्यात सोमय्या तंत्रनिकेतनचे चमू विजयी

कबड्डी सामन्यात सोमय्या तंत्रनिकेतनचे चमू विजयी

महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ चंद्रपूर द्वारा संचालित सोमय्या तंत्रनिकेतन कॉलेजने कबड्डी स्पर्धेत यश मिळवले आहे.हि स्पर्धा महाराष्ट्र तंत्रशिक्षण मंडळ मुंबई द्वारा संचालित IEDSSA (एंटर इंजिनियरिंग डिप्लोमा स्टुडंट स्पोर्ट्स असोसिएशन) मार्फत श्रीमती कुसुमताई वानखेडे इन्स्टूट ऑफ फार्मसी काटोल नागपूर मध्ये नुकतीच पार पडली, त्यामध्ये सोमय्या तंत्रनिकेतनच्या .विध्यार्थानी अव्वल कामगिरी करीत संस्थेचे नाव रोशन केले.

यास्पर्धेत नागपूर, गडचिरोली ,भंडारा,गोंदिया,चंद्रपूर ज़िल्हातील पदविका अभ्यासिका विद्यालयांनी भाग घेतला,या स्पर्धेत अंतिम सामन्यात विजयी ठरले,या संघात  युवराज भोयर,उमेश बांगडे,गुंजन  पेटकर,प्रथम विहीरघरे,चैत्तन्य बडवाईक,प्रणित उराडे,करण हिवरकर,दिशांत राजूरकर,अनिकेत अनुपम,संदेश पोटे,साहिल मामीडवार,ओंकार सायंकार,या विध्यार्थानी सहभाग घेतला होता यशाबद्धल संस्थेचे अध्यक्ष श्री.पी.एस.आंबटकर ,उपाध्यक्ष श्री.पियुष आंबटकर,प्राचार्य श्री जमीर शेख , उपप्राचार्य प्रा.डॉ.शिनगारे, रजिस्टार बिसन सर यांनी हार्दिक अभिनंदन केले आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

तसेच विभागप्रमुख आणि शिक्षक,शिक्षकेतर यांनी सर्व विधार्थांचे अभिनंदन केले,तसेच प्रा.आशिष भरडकर यांनी संघाची जवाबदारी घेतली आणि  क्रीडा प्रमुख प्रा.कमलेश ठाकरे यांनी महत्वाची भूमिका पार पाडली.

Previous post सोमय्या तंत्रनिकेतन येथे पंडित नेहरू यांची जयंती साजरी
Next post IEDSSA स्पोर्ट्समध्ये सोमय्या तंत्रनिकेतन विधार्थीनीचे उत्कृष्ट प्रदर्शन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Chief Editor

Shri. P. S. Ambatkar

Chief Editor - Daily Deshanayak News