वार्षिक सांस्कृतिक महोत्सव व निरोप समारंभ

महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित सोमय्या पॉलीटेक्नीक कॉलेजच्या प्रांगणात स्पर्श 2026 कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी संस्थेचे अध्यक्ष श्री.पी.एस आंबटकर, संस्थचे उपाध्यक्ष श्री. पियुष आंबटकर, डायरेक्टर सौ.अंकिता पी.आंबटकर , सानिया खान स्नेहा अवताडे , प्राचार्य राजदा सिद्दकी, डॉ.शीतल कोलपाकवार ,प्राचार्य जमीर शेख, उपप्राचार्य श्री. अनिल खुजे, उपप्राचार्य डॉ.हिरेद्र हजारे ,प्राचार्य डॉ.नागा राजू , प्रा.दीपक मस्के, प्रा. भारत बाबरे, प्रा. दीपक नगराळे, प्रा. अमित ठाकरे, प्रा. विद्या बल्लमवार, प्रा.प्रियका जेणेकर, प्रा. कमलेश ठाकरे , प्रा.मोजस , प्रा.अमित जोगे ,रजिस्ट्रार राजेश बिसन सर उपस्थित होते, सर्वप्रथम प्रमुख अतिथी हस्ते दीपप्रज्वलन करीत नटराजचा मूर्तीला माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
या कार्यक्रमाची प्रास्ताविक प्राचार्य जमीर शेख ह्यांनी केल्यानंतर संस्था अध्यक्ष श्री.पी.एस आंबटकर ह्यांनी विधार्थांशी संवाद साधला त्यामध्ये विधार्थानी योग्य पद्धतीने आणि सातत्याने अभ्यास करावा व जास्तीत जास्त गुण मिळवून विधार्थानी यशस्वी व्हावे त्याकरिता विधार्थानी संस्थेतर्फ सर्व प्रकारचे मार्गदर्शन करायचे अभिवचन दिले तसेच जे विधार्थी गुणानुक्रमे उत्कृष्ट गुण प्राप्त करतील त्यांना संस्थे तर्फ लॅपटॉप आणि टॅब देण्यात येईल असे घोषित केले.
स्पर्श 2026 च्या आयोजनामध्ये विधार्थांन करीता सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, सोमय्या इन्स्टिट्यूट ऑफ टेकनॉलॉजि कॉलेज ,सोमय्या पॉलीटेक्नीक कॉलेज,सोमय्या आय टी.आय. कॉलेज तसेच डीफार्म ,विधार्थांचा सहभाग नोंदविला होता. फॅशन शो,डान्स शो,रॅम वॉक,गायन स्पर्धा घेण्यात आले,तसेच उत्कृष्ट विधार्थांना यात विजयी व उपविजयी स्पर्धकांना सन्मान चिन्ह आणि प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले.
तसेच सोलो डान्स शो मध्ये प्रथम क्रमांक त्रिशा उराडे संघनक विभागातुन, द्वितीय क्रमांक आचल सोनावणे मायनींग विभागातील तसेच वर्षीनी कणकुटला हिने तृतीय क्रमांक पटकाविला, तसेच ग्रुप डान्समध्ये प्रथम क्रमांक सोमय्या इन्स्टिट्यूट ऑफ टेकनॉलॉजि स्पार्कर ग्रुप आणि द्वितीय क्रमांक एवं ईगत ग्रुप नी पटकाव आणि तृतीय क्रमांक मनस्वी ग्रुप नि पटकाविला तसेच गायन स्पर्धा मध्ये प्रथम क्रमांक हर्षित आखाडे रॉबिन चिलकुलवार तृतीय क्रमांक विधार्थीनी पटकाविला, द्वितीय क्रमांक हर्षदा आखाडे ,तृतीय क्रमांक राहील शेख ह्या विधार्थीनी पटकाविला. तसेच तृतीय वर्षातील विधार्थामधून मिस्टर सोमय्या हॅंडसॉम साहिल शेख इलेकट्रोनिकस आणि टेलीकॉम्युनिकेशन विभागातील आणि मिस. सोमय्या गौतमी साखरकर संगणक इंजिनीरिंग विभागातील विधार्थाना देण्यात आले.
प्रमुख पाहुण्यानी आपले मनोगत वक्त करीत आपण ज्या क्षेत्रात उत्तम काम करू शकतो,ज्या क्षेत्राची आवड आहे,अशा क्षेत्राची करिअरसाठी निवड करावी,केवळ क्षेत्र आवडल्याने यश मिळत नाही तर करिअर निवडल्यानंतर ज्या क्षेत्रात अविरत निष्ठने काम केल्यास यश मिळते .स्पर्धा परीक्षाक्षेत्र शिगेला पोहोचली आहे. पाहुण्यानी आपले मनोगत वक्त करीत ,अधिकारी बनल्यानंतर देश सेवा डोळ्यासमोर ठेऊन कार्य करण्याचे आव्हान त्यांनी उपस्थित विध्यार्थाना केले तसेच अन्य मान्यवरांनी आपली मनोगत व्यक्त केले.
तसेच त्यांनी विध्यार्थाना आपल्या कर्तव्याची जाणीव करून दिली व उज्वल भविष्यबद्धल शुभेच्या दिल्या, यशावर आणि प्रगतीवर प्रतिबिंबित करण्याची आणि भविष्यासाठी उद्दिष्टे निश्चित करण्याची ही संधी असते.शिक्षकांचे मार्गदर्शन यातून आपल्या उज्ज्वल भविष्याची सुरुवात होते. यशावर आणि प्रगतीवर प्रतिबिंबित करण्याची आणि भविष्यासाठी उद्दिष्टे निश्चित करण्याची ही संधी असते.शिक्षकांचे मार्गदर्शन यातून आपल्या उज्ज्वल भविष्याची सुरुवात होते. आजचा दिवस आपल्या आयुष्यातील सर्वात अविस्मरणीय दिवस आहे, मनोबल वाढवण्यासाठी, समुदायाची भावना वाढवण्यासाठी आणि ध्येयाप्रती बांधिलकी मजबूत करण्यासाठी हे एक शक्तिशाली साधन आहे. सूत्र संचालन प्रा. नवशाद सर सोबत भाविका यांनी केले.
ह्या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाकरिता संस्थेतील सर्व विभागातील विभाग प्रमुख आणि सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व विधार्थानी प्रयत्न केला.
