सोमय्या ग्रुप येथे गुढी उभारून नवं वर्षाचे स्वागत

महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित सोमय्या पॉलटेक्निक कॉलेज वडगाव येथे नवं वर्षाचे स्वागत करण्यात आले, संस्थेचे संस्थापक श्री. पी. एस. आंबटकर, प्राचार्य श्री.जमीर शेख ,उपप्राचार्य अनिल खुजे ,प्राचार्य डॉ. हिरेंद्र हजारे, रजिस्टर श्री.बिसेन सर मंचावर उपस्थित  होते, तसेच संस्थापक श्री. पी. एस. आंबटकर यांच्या हस्ते गुढी उभारून हिंदू नवीन वर्षाचे स्वागत करण्यात आले .

संस्थेचे अध्यक्ष भाषण देत असताना नवीन वर्षाचे स्वागत करीत सर्वाना शुभेच्छा दिल्या, गुढी पडावा म्हणजे हिंदू नववर्षाचा पहिला दिवस,हा सण चैत्र शुद्ध प्रतिपदेला साजरा करण्यात येतो.महाराष्ट्रत मोठया उत्साहाने सण साजरा केला जातो.या दिवशी गुढी उभारली जाते,या गुढीला विजयाचे व समृद्धीचे प्रतीक मानले जाते.

तुम्हाला आनंद आणि समृद्धी देओ, नवीन सकाळ, नवीन अशा, यश, नवीन योजना, तसेच नवीन वर्ष हे सुखमय जाओ, नव्या उमेदीने झेप घेऊन नवं वर्षाचे स्वागत केले, शिक्षकांनी नव्या संकल्पना, आपले ध्येय पूर्ण करण्याची नव्या जुन्या आठवणी सांगत विचार मांडले.

हया कार्यक्रमाकरीता संस्थेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थीत होते.

Previous post सोमय्या डिप्लोमा इन इंजिनीरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी AI Trainer साठी मेगा कॅम्पस ड्राइव्ह मध्ये सुवर्ण संधी……
Next post सोमय्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अभियांत्रिकी व पॉलिटेक्निक च्या सिपेट सोबत MoU अंतर्गत करार

Chief Editor

Shri. P. S. Ambatkar

Chief Editor - Daily Deshanayak News