
महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ व्दारे संचालित बाबुपेठ स्थित पैरामाऊँन्ट कॉन्व्हेंट मध्ये KG.I॥ च्या विदयार्थ्यांसाठी दिक्षांत समारोहाचे आयोजन केल्या गेले.
या कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुणे म्हणुन संस्थेचे अध्यक्ष पी. एस. आंबटकर हे होते, पाहुणे पियुष आंबटकर, प्रांजली रपाताटे, ITI चे प्राचार्य अशोक खिरटकर, शाळेचे मुख्याध्यापक फैयाज अहमद आणि शाळेची उपमुख्यध्यापीक लिपिका अधिकारी हे उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात दिप प्रज्वलन करुण तसेच सरस्वती मातेला प्रतिमेला मालार्पण करुण करण्यात आली. विशांत समारोह का आयोजीत केल्या गेले? याबद्दल मुख्याध्यापक फैयाज अहमद यांची प्रास्ताविक मांडले.
तसेच पालकानी सुध्दा आपले मनोगत व्यक्त करत म्हटले की अश्याच प्रकारचे कार्यक्रम करत असल्यामूळे विदयार्थ्यांना स्फूर्ती मिळते, पाहुण्यांची सुध्दा आपआपल्या भाषणात विद्यार्थ्यांना उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाला यशस्वीरीत्या पार पाडण्याकरीता किरण सावरकर, जयश्री नल्लालवार, कविता रेडी, परमेश्वरी कामिला, सुरेश झुंगरे, अजिंक्य परसोडकर आदिनी प्रयत्न केला.
