मॅकरूण स्टूडटंस अकॅडमी सीबीएसई स्कुल वडगाव, चंद्रपूर येथे एस.एस.सी. परीक्षेचा १०० टक्के निकाल

चंद्रपूरातील नामावंत मॅकरूण स्टूडटंस  अकॅडमी  सीबीएसई स्कुल, वडगाव, चंद्रपूर येथील शाळेचा यावर्षी सुध्दा एस.एस.सी. परीक्षेचा १०० टक्के निकाल लागलेला आहे, शाळेने ही परंपरा मागील सतरा वर्षापासून जपून ठेवलेली आहे, त्यामध्ये श्रिष्टी दास ९१.००%, शेशिधर गोरे ९१.००%, ओम वैरागडे ८६.००%, सृष्टी होकम ८६.००%, वैष्णवी वासेकर ८६.००%, आर्यन पिंपले ८६.००%, गीत बीसेन ८६.००% गुण मिळविलेले आहे.

 

सुसज्य सुंदर इमारतीत शाळेच्या आवारात कलागुण निपुनः उच्च शिक्षित शिक्षक गुणांनी अथक परिश्रम घेत विद्यार्थ्यांना सर्वोपरी शिक्षण घेत गुणांची भरारी मारलेली आहेत. त्यामध्ये एकुण वि‌द्यार्थ्यांन पैकी दोन विदयाथी ९१ टक्केच्यावर, ०५ विदयार्थी ८५ टक्केच्यावर, १४ विदयार्थी ७५ टक्केंच्यावर तसेच ८१ विदयार्थी ६० टक्केच्यावर राहिले. तसेच वर्षभरात एकून ११ वेळा प्री टेस्ट घेतल्या आहेत. मुलांची विषयांतील कमजोरी निवडून त्यांचे गुण वाढविण्यासाठी वाचन, लिखान, उत्तम शैली याचे योग्य मार्गदर्शन केलेले आहेत.

 

सोमैय्या गृप तर्फे चालविण्यात येणाऱ्या शाळेचे संस्थापक / अध्यक्ष श्री. पी. एस. आंबटकर, उपध्याक्ष श्री.पियुष आंबटकर, संचालक अंकिता आंबटकर, संचालक प्रांजली रघताटे आणि शाळेचे प्राचार्य श्री. फैयाज अहमद आणि त्यांचे शिक्षकगण ह्यांनी  घेतलेल्या परिश्रमाचे कौतुक केले, तसेच उत्तीर्ण झालेल्या वि‌द्यार्थ्यांचे देखील त्यांनी अभीनंदन केले आणि समोरील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

 

 

 

 

Previous post सोमय्या आयुर्वेदिक मेडीकल कॉलेज आणि हॉस्पिटल भद्रावती येथे सचिव सौ. प्रीती पांडुरंगजी आंबटकर यांचा हस्ते रुग्णांना जीवनावश्यक वस्तूची वितरण
Next post पॅरामाऊँन्ट कॉन्व्हेंट येथे “गिनिज बुक वर्ल्ड रेकॉर्ड” मध्ये सहभागी विदयार्थ्यांचा सम्मान

Chief Editor

Shri. P. S. Ambatkar

Chief Editor - Daily Deshanayak News