
आंबच्या वजन एक किलो सहाशे ग्राम
यवतमाळ : एका किलोत साधारणतः: चार तरी आंबे बसतात. मात्र, एक आंबा दीड किलोचा म्हटले की, कुणाचा विश्वास बसणार नाही. मात्र, हे खरे आहे. तालुक्यातील डेहणी येथील संतोष अटल यांच्या शेतातील बाटली आंबा चक्क एक किलो सहाशे ग्रॅमचा आहे. खायला चवदार आणि रुचकर असलेला हा आंबा रसाळ आहे. एकदा तरी चव चाखावी, असा हा आंबा बाजारात नेतानेताच संपतो असे सदर शेतकर्यांचे म्हणणे आहे.
सध्या रसाळीचा मौसम आहे. बाजारात विविध प्रकारचे आंबे विक्रीला आले आहेत. त्यात हापूस, देवगड, रत्नागिरी, लालपट्टा, केशर, पेवंदी, कलमी, बैगमफल्ली, राजापुरी, लंगडा, दशेरीसह विविध प्रकारचे आंबे आदींचा समावेश आहे. मात्र, तालुक्यातील डेहणी येथील डेहणी येथील बाटली आंब्याने त्यात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. ही बाब कृषी शास्त्रज्ञांनी दखल घेण्यासारखी आहे. या प्रजातीला विकसित केल्यास शेतकर्यांसाठी आंबा पीक फायदेशीर ठरेल, असे शेतकर्यांचे म्हणणे आहे. यंदा उत्तरप्रदेश, गुजरात, आंध्रप्रदेशामधून बाजारात आंबे आले आहेत. आंब्याचा रंग, आकार, सुगंध व चवीमुळे फळांचा राजा म्हणून आंब्याला स्थान प्राप्त झाले आहे. दिग्रस तालुक्यातील कलगाव शिवारातील बाटली आंबा बघितला की फळांचा राजा म्हणून आंब्याला दिलेले नामाभिदान योग्यच वाटते. दिग्रस येथील संतोष अटल यांच्या शेतातील हा आंबा आहे. त्यातील एका आंब्याचे वजन तब्बल एक किलो सहाशे ग्रॅम एवढे भरल्याने या आंब्याच्या वाणाची सर्वत्र चर्चा होत आहे. हे आंब्याचे वाण आकाराने मोठे असून एका आंब्याचे सरासरी वजन सव्वा ते दीड किलो भरते. या आंब्याचे शास्त्रीय नाव लुप्त झाल्याने तो बाटली आंबा या नावाने ओळखला जातो. त्याचे कारण असे की, हा आंबा झाडावरून उतरविताना खुडीच्या बाटलीत एकच बसतो. त्यामुळे त्याचे नामकरण ’बाटली’ असे ठेवण्यात आले आहे. आंब्यातील कोय (खुयटी) लहान असून त्यात गर (रस) जास्त प्रमाणात आहे. आंब्याची चव व गोडव्यामुळे हा आंबा सर्वांच्या पसंतीला उतरला आहे.