सोमय्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अभियांत्रिकी व पॉलिटेक्निक च्या सिपेट सोबत MoU अंतर्गत करार

महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित सोमय्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (SIT), चंद्रपूर व सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोकेमिकल इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी (CIPET), चंद्रपूर यांच्या मध्ये MoU अंतर्गत करार करण्यात आला.

 

या MoU मुळे सोमय्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी महाविद्यालयातील अभियांत्रिकी व पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांना भविष्यात सिपेट सोबत विविध प्रकल्पांमध्ये काम करण्याची तसेच इंटर्नशिप करण्याची संधी मिळणार आहे, याचा फायदा विद्यार्थ्यांना त्यांच्या अंतिम वर्षामध्ये प्लेसमेंट  साठी होणार आहे.

 

या MoU साठी सोमय्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी तर्फे श्री. प्रवीण बच्चाव, डायरेक्टर अँड हेड, सिपेट व श्री. पुष्कर देशमुख प्लेसमेंट ऑफिसर, सिपेट यांचे विशेष आभार मानले आहे.

 

या MoU साठी संस्थेचे अध्यक्ष श्री. आंबटकर सर, सोमय्या ग्रुप ऑफ  इन्स्टिट्यूट यांचे विशेष सहकार्य लाभले. तसेच सोमय्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी चे प्राचार्य डॉ. हिरेंद्र हजारे प्राध्यापक नीरजा बोनागीरी व डॉ. सागर कुडकेलवार यांनी मेहनत घेतली आहे.

Previous post सोमय्या ग्रुप येथे गुढी उभारून नवं वर्षाचे स्वागत
Next post सोमय्या डिप्लोमा इन इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागातील विधार्थ्यांसाठी दोन दिवसीय कार्यशाळाचे आयोजन

Chief Editor

Shri. P. S. Ambatkar

Chief Editor - Daily Deshanayak News