
चंद्रपूर : ताडोबातील 50 वाघांचे राज्यात इतरस्त्र स्थलांतरण करण्यात येणार असल्याची माहिती वनमंत्री संजय राठोड यांनी जाहीर केली
याबाबत संजय राठोड यांनी एका वृत्त वहिनीस दिलेल्या मुलाखतीत ही बाब स्पष्ट केली.
मानव व्याघ्र संघर्ष कमी करण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येणार असल्याचीही माहिती त्यांनी दिली.
याच वेळी ताडोबातील 50 वाघांचे राज्यातील लवकरच स्थलांतरण करण्यात येईल. या वाघाचं इतर जिल्ह्यातील जंगलामध्ये स्थलांतरण केले जाणार आहे. मानव व्याघ्र संघर्ष कमी करण्यासाठी लवकरच धोरण जाहीर करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.