सोमय्या पॉलीटेक्नीक चंद्रपूर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन

सोमय्या पॉलीटेक्नीक चंद्रपूर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन

महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ,चंद्रपूर द्वारा संचालित सोमय्या पॉलीटेक्नीक, वडगाव येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. संस्थेचे संस्थापक श्री.पी.एस.आंबटकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून हे शिबीर श्री. संत साईनाथ ब्लड सेंटर हॉस्पीटल नागपूर यांच्या संयुक्त विध्यमानाने रक्तदान शिबीर घेण्यात आले.

ह्या रक्तदान शिबिराचे उदघाटन संस्थेचे संस्थापक श्री.पी.एस.आंबटकर ह्यांच्या हस्ते करण्यात आले. ह्या प्रसंगी डीफॉर्म चे विध्यार्थी,सोमय्या प्रायव्हेट आय .टी.आय. चे विध्यार्थी व विधार्थिनीने मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवून रक्तदान केले.त्याच प्रमाणे सोमय्या पॉलीटेक्नीकच्या शिक्षकांनी रक्तदान केले, त्यामध्ये राजेश बिसेन सर, प्रा.खुजे सर ,प्रा.कोटकर मॅडम , प्रा.ठाकरे सर , प्रा.डे सर, प्रा.जोगी सर, प्रा.यादव सर, प्रा.जंजालावॉर मॅडम तसेच अनेक शिक्षकांचा रक्तदान केले.

ह्याप्रसंगी श्री.पी.एस.आंबटकर यांनी रक्तदानाचे महत्व सांगताना ” रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे ” असे मार्गदर्शन व्यक्त केले.

या शिबिराच्या यशस्वीतेसाठी श्री. संत साईनाथ ब्लड सेंटर हॉस्पीटलचे डॉ.किशोर भांडेकर, शशांक कुइटे, विश्रांती कायारकर, प्रणाली राऊत, स्वीटी गायकवाड, अक्षय घरडे, ह्यांनी सहकार्य केले. तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी,विध्यार्थी आणि विधार्थिनीनी मौलाचे सहकार्य केले.

Previous post सोमय्या ग्रुपच्या वतीने शिक्षण सम्राट श्री.पी एस. आंबटकर याना जन्मदिवसांच्या दिल्या शुभेच्छा 
Next post सोमय्या तंत्रनिकेतन येथे श्री.संताजी महाराजांची जयंती संपन्न

Chief Editor

Shri. P. S. Ambatkar

Chief Editor - Daily Deshanayak News