सोमय्या ग्रुपच्या वतीने शिक्षण सम्राट श्री.पी एस. आंबटकर याना जन्मदिवसांच्या दिल्या शुभेच्छा 

सोमय्या ग्रुपच्या वतीने शिक्षण सम्राट श्री.पी एस. आंबटकर याना जन्मदिवसांच्या दिल्या शुभेच्छा

महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळाच्या विदर्भातील शिक्षण क्षेत्रात यशाची भरारी घेणारी संस्था म्हणून महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळचे नाव सन्मानाने घेतले जाते. संस्थापक श्री.पी. एस. आंबटकर यांचा जन्मदिवस साजरा करण्यात आला .

संस्थेचे संस्थापक श्री. पी. एस. आंबटकर, सचिव सौ. प्रीती पांडुरंगजी आंबटकर ,उपाध्यक्ष श्री. पियुष आंबटकर, डायरेक्टर सौ. अंकिता पियुष आंबटकर, सौ.प्रांजली राघाताटे, डॉ.पायल आंबटकर ,रजिस्टर श्री.बिसन सर तसेच, प्राचार्य सौ. शोभना मॅडम ,प्राचार्य श्री. फैय्याज सर, प्राचार्य राजदा सिद्धंकी, प्राचार्य श्री.जमीर शेख सर, प्राचार्य श्री. दीपक मस्के सर, प्राचार्य श्री. खुजे सर उपस्थित होते, सर्वप्रथम सरस्वती मातेला आणि माँ भवानीला मातेला वंदन करून दिपप्रज्वलन करीत कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आले.

प्राचार्य आणि मान्यवरांनी त्यांचाबद्धल कौतुक करीत असताना आयुष्याच्या या पायरीवर तुमच्या नव्या जगातील,नव्या स्वप्ननाचा बहर येऊ दे,इच्छा ,आकांक्षा उंच-उंच भरारी घेऊ दे,मनात आमच्या एकच इच्छा आपणास उदंड आयुष्य लाभू दे, दर्जेदार शिक्षणासह सामाजिक बांधिलकीतुन या संस्थेचा जन्म झाला ,तसेच त्यांचे सुपुत्र उपाध्यक्ष श्री.पियुष आंबटकर आणि पत्नी सौ. अंकिता पियुष आंबटकर, कुटुंबाच्या सोबतीने जिद्ध आणि संस्थेविषयी असेलेली आस्था यामुळे हे शक्य झालेले आहे,या माध्यमातून चंद्रपूर जिल्ह्यातून विद्यार्थांना , चंद्रपूर जिल्ह्यातून दर्जेदार आणि मूल्यवर्धित शिक्षणाच्या माध्यमातून त्यांच्या करियरसाठी नवी दारे उघडली आहेत ते नेहमी यशस्वी व्हावे अशी कामना करीत सर्व शिक्षकगण श्री.पी एस. आंबटकर यांच्या जन्मदिवसचा शुभेच्छा दिल्या .

तसेच आत्मविश्वास, जिद्ध, चिकाटी आणि परिश्रम करण्याची आणि आपल्या कार्याप्रती समर्पणाची भावना असेल तर यश हे आपोआपच आपल्या जवळ चालत येते हा यशाचा मूलमंत्र श्री.पी.एस.आंबटकर यांनी जपत आपल्या जीवनाचा प्रवास करीत आहे,त्याच्या या संस्कारांची शिदोरी घेऊनच आम्हीही आज आपल्या जीवनाची वाटचाल करीत आहोत.

 

“Nothing is impossible का नारा लेकर Everything is possible “ असे म्हणणारे MSPM चे संस्थापक श्री.पांडुरंगजी आंबटकर याना शिक्षण महर्षी म्हणून ओळखल्या जाते.

या कार्यक्रमाला सर्व विभाग प्रमुख आणि सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थिती होती.

Previous post सोमय्या आयुर्वेदिक हॉस्पिटल भद्रावती येथे धन्वंतरी जयंती पारंपरिक पद्धतीने साजरी
Next post सोमय्या पॉलीटेक्नीक चंद्रपूर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन

One thought on “सोमय्या ग्रुपच्या वतीने शिक्षण सम्राट श्री.पी एस. आंबटकर याना जन्मदिवसांच्या दिल्या शुभेच्छा 

  1. В этой публикации мы сосредоточимся на интересных аспектах одной из самых актуальных тем современности. Совмещая факты и мнения экспертов, мы создадим полное представление о предмете, которое будет полезно как новичкам, так и тем, кто глубоко изучает вопрос.
    Углубиться в тему – https://vivod-iz-zapoya-2.ru/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Chief Editor

Shri. P. S. Ambatkar

Chief Editor - Daily Deshanayak News