
विधार्थानी केला विविध कार्यक्रमात सहभाग
महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित सोमय्या आयुर्वेदिक मेडीकल कॉलेज आणि हॉस्पिटल येथे राष्ट्रीय आयुर्वेदिक दिवस साजरा करण्यात आला. दिनांक २३/०९/२०२५ ला राष्ट्रीय आयुर्वेद दिवस साजरा करण्यात आला ,त्यामध्ये जनजागृतीसाठी रॅली,मेळावा काढण्यात आले.आयुर्वेदिक उपचार तसेच आपल्या दैनंदिन जीवनात समावेश करण्यासाठी आणि निरोगी जीवन जगण्यासाठी आयुर्वेदाचे महत्व,आहार ,योग,नाटक स्वरूपात विधार्थानी आयुर्वेदिक दिनचर्या सादर केले.
सोमय्या आयुर्वेदिक वैद्यकीय महाविद्यालयतील प्राचार्य डॉक्टर शीतल कोलपाकवार (कापार्तीवार) यांनी आयुर्वेदा पीपल फॉर प्लॅनेट याबद्दल मार्गदशन केले, आयुर्वेदाला वैज्ञानिक व समग्र औषध प्रणाली म्हणून प्रोत्साहन देण्यासाठी या दिवसाला अधिकृत मान्यता दिली आहे. याचा उद्देश आयुर्वेदाच्या सामर्थ्याबद्दल आणि उपयुक्ततेबद्दल जनजागृती करणे, तसेच प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा व निरोगीपणाला चालना देणे आहे.
सोमय्या आयुर्वेदिक वैदकीय महाविद्यालय व रुग्णालय ,सुमठाना भद्रावतीचे अध्यक्ष श्री.पी.एस आंबटकर अशा प्रकारच्या कार्यक्रमासाठी सदैव प्रोत्साहित करीत असतात.
तसेच याकार्यक्रमात मैकरून स्टुडन्ट अकॅडमि च्या प्राचार्य राजदा सिद्धकी, डॉ.राजेश गटटूलवर, डॉ.आशिष बोबडे , डॉ.प्रज्ञा, डॉ.स्नेहा वाकडे तसेच रुग्णालय कर्मचारी आणि विधार्थी उपस्थित होते.
https://shorturl.fm/pIJyQ
https://shorturl.fm/ghHoh
https://shorturl.fm/vkZwE
https://shorturl.fm/aPOkg
https://shorturl.fm/IhCfb