सोमय्या पॉलीटेक्नीक येथे महाराष्ट्र दिन साजरा

महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळद्वारा संचालित वडगाव येथील सोमय्या पॉलीटेक्नीक कॉलेजमध्ये महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आले याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष श्री. पी. एस. आंबटकर, उपाध्यक्ष श्री. पियुष आंबटकर, सचिव सॊ. प्रीती पा. आंबटकर ,सॊ. अंकिता पी.आंबटकर, प्राचार्य जमीर शेख, रजिस्टार बिसन सर, मंचावर उपस्थित होते.

१ मे रोजी महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहाने आणि सर्व एकत्र येऊन साजरा करण्यात येतो, १ मे १९६० रोजी महाराष्ट्राची निर्मिती झालेली आहे.

महाराष्ट्र हा पुरोगामी विचारांचा वारसा असलेला राज्य आहे. आपल्या महाराष्ट्र राज्यात अनेक थोर समाज सुधारक होऊन गेले. आपल्या महाराष्ट्र राज्यात सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे. महाराष्ट्र राज्याची भूमी हि वीर पुरुषांच्या पवित्र विचारांनी पावन झालेली भूमी आहे. महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी अनेक हुतात्मांने बलिदान दिले तेव्हा कुठे आपल्याला आपले महाराष्ट्र राज्य मिळाले. त्या हुतात्मांचे स्मरण या दिवशी केले जाते. महाराष्ट्र राज्याने शिक्षण क्षेत्र, क्रीडाक्षेत्र ,चित्रपट सृष्टी, तंत्रज्ञान अश्या अनेक क्षेत्रात उत्कृष्ट भरारी घेतलेली आहे. १ मे महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना शुभेच्या देऊन महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला.

ह्या कार्यक्रमा करिता संस्थेतील विभाग प्रमुख प्रा. डॉ. शिंगरे सर, प्रा. नगराळे सर, प्रा. पोहनकर सर, प्रा. ठाकरे सर, प्रा. सोंडवले सर, प्रा. बाबरे सर, तसेच सर्व शिक्षक व शिक्षेकत्तरी कर्मचारी उपस्थित होते.

Previous post सोमय्या पॉलीटेक्नीक येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी
Next post सोमय्या पॉलीटेक्नीक विध्यार्थीचा राजीवगांधी मध्ये विविध स्पर्धेमध्ये अव्वल क्रमांक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Chief Editor

Shri. P. S. Ambatkar

Chief Editor - Daily Deshanayak News