
663 नमुन्यांपैकी ; 580 निगेटिव्ह
चंद्रपूर : जिल्ह्यात दिनांक 18 मे 19 मे रोजी एकूण 64 संशयित व्यक्तींचे कोविड-19 तपासणीसाठी नमुने घेतले असता 10 नमुने पॉझिटिव्ह आढळले असून सध्या सर्व 10 रुग्णांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चंद्रपूर येथे विलगीकरण कक्षात भरती करण्यात आलेले असुन सर्वांची प्रकृती स्थिर आहे. 2 मे रोजी आढळलेला पॉझिटिव्ह रुग्ण हा कोरोना मुक्त झाला आहे.तर 13 मे रोजी बिनबा गेट परिसरामध्ये आढळलेला रुग्ण विलगीकरण कक्ष चंद्रपूर येथे भरती असून सदर रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. आता चंद्रपूर जिल्ह्यात पॉझिटिव्ह रुग्णाची एकूण संख्या 12 आहे.तर, 71 नमुने प्रतीक्षेत आहेत.
आरोग्य विभागाने आज जारी केलेल्या मेडिकल बुलेटीन मध्ये 20 मे रोजी आढळलेले 10 रुग्णांच्या संपर्कातील संशयित व्यक्तींचे कोविड-19 तपासणीसाठी नमुने घेण्यासाठी आवश्यक असलेल्या ग्रामीण भागात एकूण 6 कंटेनमेंट झोन कार्यान्वित करण्यात आलेले असून कंटेनमेंट झोन मधील सर्व कुटुंबातील लोकसंख्येचे दैनंदिन 14 दिवस आरोग्य कर्मचाऱ्यांच्या पथकामार्फत सर्वेक्षण करण्यात येत आहे. व आयएलआय व सारीचे रुग्ण शोधून त्यांना उपचारासाठी आणण्यात येत आहे. यापूर्वीचा 1 झोन व सध्याचे 6 झोन असे एकूण 7 कंटेनमेंट झोन कार्यान्वित करण्यात आलेले आहे.
जिल्ह्यात कंटेनमेंट झोन क्र.1 बिनबा गेट येथे एकूण 4 आरोग्य पथकामार्फत 190 घरांचे सर्वेक्षण पूर्ण झालेले आहे. कंटेनमेंट झोन क्र.2 दुर्गापुर मधील वार्ड क्र. 3 येथे एकूण 5 आरोग्य पथकामार्फत 190 घरांचे सर्वेक्षण झाले. कंटेनमेंट झोन क्र.3 विसापूर बल्लारपूर येथे एकूण 11 आरोग्य पथकामार्फत 516 घरांचे सर्वेक्षण झाले. कंटेनमेंट झोन क्र.4 जाम तुकुम पोंभुर्णा येथे एकूण 5 आरोग्य पथकामार्फत 310 घरांचे सर्वेक्षण झाले. कंटेनमेंट झोन क्र.5 चिरोली मूल येथे 22 आरोग्य पथकामार्फत 1 हजार 97 घरांचे सर्वेक्षण झाले. कंटेनमेंट झोन क्र.6 विरव्हा सिंदेवाही येथे आरोग्य पथकामार्फत 173 घरांचे सर्वेक्षण झाले.कंटेनमेंट झोन क्र.7 लक्कडकोट राजुरा येथे 10 आरोग्य पथकामार्फत 516 घरांचे सर्वेक्षण झालेले आहे.
जिल्ह्यातील कोविड-19 ची सर्वसाधारण माहिती पुढीलप्रमाणे आहे. एकूण चाचणी केलेल्या नागरिकांची संख्या 663 आहे.यापैकी 12 पॉझिटिव्ह नागरिक असून 580 नागरिक निगेटिव्ह आहेत. तर 71 व्यक्तींचे नमुने प्रतीक्षेत आहेत.
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 2 हजार 59 नागरिक संस्थात्मक अलगीकरण आहेत. यापैकी तालुकास्तरावर 1 हजार 818 तर चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रात 241 नागरिकांची संस्थात्मक अलगीकरण झाले आहे. तसेच 53 हजार 60 नागरिकांचे गृह अलगीकरण पूर्ण झालेले असून 14 हजार 493 नागरिक गृह अलगीकरण प्रक्रियेत आहे.