सोमय्या पाॅलिटेक्नीक येथे प्रजासत्ताक दिन साजरा

 

महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ चंद्रपूर व्दारा संचालित सोमय्या पाॅलिटेक्नीक,मॅकरून स्टूडेंट अॅकेडमी आणि ज्युनिअर सायन्स काॅलेज, प्रायव्हेट अय.टी.आय., यांचा संयुक्तरित्या प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला, या कार्यक्रमाकरिता प्रमुख पाहुणे संस्थेचे अध्यक्ष श्री. पी. एस. आंबटकर, उपाध्यक्ष श्री. पियुष आंबटकर, प्राचार्य श्री. जमीर शेख, रजिस्टार राजेश बिसन, प्राचार्य श्री. रोशन रामटेके, प्राचार्य मनिष हिवरे, मंचावर उपस्थि होते.कार्यक्रमाच्या सुरूवातीला संस्थेचे अध्यक्ष श्री. पी.एस.आंबटकर हयांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले, यानंतर माता सरस्वतीच्या प्रतिमेला माल्यार्पण व दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली, हया प्रसंगी सामुहिक फ्लॅग सेल्यूट परेड, देश भक्तीपर गीत, सादर केले.
संस्थेचे अध्यक्ष श्री.पी.एस.आंबटकर मार्गदर्शन करित असतांना 26 जानेवारी हा गणराज्य दिन म्हणून ओळखला जातो, भारताला ब्रिटीश राजवटी पासून 15 आॅगष्ट 1947 रोजी स्वातंत्र मिळाले, यामागे भारताचा स्वातंत्र लढा आणि महात्मा गांधी यांच्या अहिंसा पध्दतीचा मोठा सहभाग आहे. डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षते खाली एक संमीती नेमली गेली, बरेच विचार विमर्श करून 26 जानेवारी रोजी संपूर्ण राष्टाªसाठी संविधान लागू करण्यात आले, भारताची राज्यघटना या दिवशी अंमलात आली, भारतीय संविधान हे संपूर्ण जगातील सर्वात मोठे लिखीत संविधान आहे. या संविधानाने सर्व धर्मातील लोकांना समान दर्जा दिलेला आहे. या संविधानाने आपले हक्क आणि अधिकरांसाठी लढण्याची ताकद दिलेली आहे. आज आपण स्वतंत्र भारतात जीवन जगत आहोत, भारतीय संविधानाने दिलेली हि खूप अनमोल ताकद आहे. भारत हा खूप शक्तीशाली देश आहे. आज अखेर आपल्या देशाने अनेक संकटावर मात केली आहे. प्रजासत्ताक दिवस हा एक प्रकारे भारताचा राष्ट्रीयउत्सव आहे.,म्हणून आपण साजरा करतो.
कोविड-19 चे भान राखून आणि नियमांचे पालन करून मॅकृ्रन स्टूडेंट अॅकेडमीचे आणि ज्यनिअर काॅलेजचे विद्यार्थि यांनी 26 जानेवारी देशभक्तीपर भाषण दीले, गीते गायली, आणि नृत्य प्रस्तूत केले, तसेच विद्यार्थि, शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचारी यांनी एकमेकांना गणराज्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या, प्रजास्त्ताक दिन दरवर्षी मोठया उत्सहाने साजरा केल्या जातो.त्यामुळे प्रत्येकाच्या मनात राष्ट्रप्रेम अधिक उजळून निघते.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री. .नौशाद सिध्दीकी सर यांनी केले, हया कार्यक्रमाकरीता संस्थेतील सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थीत होते

Previous post सोमय्या पाॅलिटेक्नीक येथे सुभाषचंद्र बोस यांची 125 वी जयंती साजरी
Next post सोमय्या पाॅलिटेक्नीक येथे वसंत पंचमी व सरस्वती पूजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Chief Editor

Shri. P. S. Ambatkar

Chief Editor - Daily Deshanayak News