महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ चंद्रपूर, व्दारा संचालित सोमय्या पाॅलिटेक्नीक वडगांव, चंद्रपूर येथे तसेच ”पराक्रम दिवस “ म्हणून साजरा करणार आहे ” तुम मुझे खुन दो,मै तुम्हे आझादी दूंगा “ अशी घोषणा करणा-या सुभाषचंद्र बोस यांचे स्थान भारतीय स्वातंत्र्य लढयात अव्दितीय असे मानले जाते. या कार्यक्रमाकरीता प्रमुख पाहुणे संस्थेचे अध्यक्ष श्री. पी. एस.आंबटकर, उपाध्यक्ष श्री. पियुष आंबटकर, प्राचार्य श्री. जमीर शेख ,रजिस्टार श्री. बिसेन सर, उपस्थीत होते.कार्यक्रमाची सुरूवात सर्वप्रथम दिपप्रज्वलन करून नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून कार्यक्रमांची सुरूवात करण्यात आली.
नेताजी सुभाषचंद्र बोस एक महान स्वातंत्र्य सेनानी होते,कठोर परिश्रम आणि महान नेतृत्व या गुणामुळे ते नेताजी म्हणून ओळखले जाऊ लागले,त्यांचा जन्म उडीसाच्या कटक येथे 23 जानेवारी 1897 रोजी झाला,त्यांच्या वडिलांचे नाव जानकीनाथ बोस व आईचे नांव प्रभादेवी होते. नोताजी सुभाषचंद्र बोस एक हुशार विद्यार्थी होते,अन्याया विरूध्द लढण्याची त्यांची प्रवृत्ती दिसून येते,कोलकत्त्यातील प्रेसीडेसी काॅलेजमध्ये त्यांनी प्रवेश घेतला. एकदा त्यांनी इंग्रज प्राध्यापक यांनी केलेल्या भारत विरोधी टिप्पणीसाठी संप पुकारला होता,त्यामुळे त्यांना काॅलेज सोडावे लागले होते,त्यांनी आझाद हिंद सेनेचे नेतृत्व केले,भारताच्या स्वातंत्र्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढण्यात त्यांचा विश्वास होता. ”तुम मुझे खुन दो,मै तुम्हे आझादी दुंगा“ असे म्हणत त्यांनी भारतीयांना इंग्रजाच्या विरूध्द पुकारलेल्या त्यांच्या लढयात सहभागी होण्यासाठी प्रेरित केले. दुसरे महायुध्द सुरू असतांना इंग्रजांशी लढण्यासाठी त्यांनी जपानच्या मदतीने आझाद हिंद फौज स्थापन केली होती,त्यांनी दिलेल्या ”जय हिंन्द “ चा नारा हा आज भारताचा राष्ट्रीय नारा बनला आहे.
”असफलताए कभी कभी सफलता की स्तंभ होती है!“
नेताजी निस्वार्थ भावनेचा आणि देशासाठी त्यांनी केलेल्या निस्वार्थ सेवेचा सन्मान करण्यासाठी भारत सरकरने त्यांची जयंती दरवर्षी 23 जानेवारी ला ”पराक्रम दिवस“ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. देशासाठी केलेले त्यांचे अप्रतिम कार्य आजही प्रत्येक भारतीयाला प्रेरणा देणारे आहे. तसेच त्यांच्या जीवनातून पे्ररणा मिळते आणि त्यांच्यात देशप्रेम आणि धैर्याची भावना दिसून येते.
हया कार्यक्रमाला उपस्थित असणारे संस्थेचे विभाग प्रमुख,तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.