सोमय्या पाॅलिटेक्नीक येथे वसंत पंचमी व सरस्वती पूजन

 

”या कुन्देदुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता
या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेत पùासना
या ब्रह्माच्यतशंकरप्रभूतिभिदेंवीःसदा वन्दिता
सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाडयापहा“

महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ चंद्रपूर व्दारा संचालित सोमय्या पाॅलिटेक्नीक येथे सरस्वती पुजन व वसंत पंचमी उत्सवात साजरी करण्यात आली, सर्व प्रथम सरस्वतीमातेच्या प्रतीमेला माल्यार्पण करून, दिप प्रज्वलन करत कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली, संस्थेचे अध्यक्ष मा.श्री. पी.एस.आंबटकर,उपाध्यक्ष श्री. पियुष आंबटकर,प्राचार्य जमीर शेख,रजिस्टार श्री.राजेश बिसेन सर,उपस्थीत होते.
माघ महिन्यातील पंचमीला देवी सरस्वती पृथ्वीतलावर अवतरली, यामुळे माघ महिन्यातील पंचमी सरस्वतीच्या नावाने साजरी केली जाते. वसंत ऋतूही याच दरम्यान बहरत असल्यामुळे, या पंचमीला वसंत पंचमी म्हटले जाते. विद्येची देवता सरस्वतीदेवीची पूजा या दिवशी केली जाते,

प्रा. जमीर शेख यांनी समयोचीत मार्गदर्शन करीत असतांना सृष्टीचे निर्माण कर्ता ब्रम्हदेवानी जेव्हा जिव आणि मनुष्याची रचना केली मात्र. केलेल्या सृष्टीकडे पाहील्यावर ती निस्तेज जाणवत असल्यामुळे सरस्वती देविची निर्मीती केली. देवीच्या एका हातात वीणा, दुस-या हातात मुद्र्रेत आणि इतर दोन हातात पुस्तके आणि माळ होती. वीणेच्या सुरांमुळे पृथ्वीवरील सर्व जीवांना, मनुष्याला वाणी प्राप्त झाली, त्या नंतर देवीला सरस्वती असे म्हटले गेले, सरस्वती देवीने वाणीसह विद्या आणि बुध्दी दिली. माघ महिन्यातील पंचमीला ही घटना घडल्यामुळे सरस्वती जन्मोत्सव रूपात ही पंचमी साजरी केली जाते.
वसंताचा उत्सव हा निसर्गाचा उत्सव आहे. वसंत पंचमीपासून पौर्णिमेपर्यंत वसंतोत्सव साजरा करतात.सतत संुदर भासणारा निसर्ग वसंत ऋुतूत सोळा कलांनी फुलून येतो. वसंत ऋुतूच्या आगमनाप्रीत्यर्थ सुवसंतक, वसंतोत्सव, अशोकोत्सव, असे उत्सव करण्याची प्रथा प्राचीन काळापासून सुरू आहे. वसंत ऋुतू आशा व सिध्दी घेऊन येतो.
हया कार्यक्रमाला संस्थेचे सर्व विभाग प्रमुख, तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.

Previous post सोमय्या पाॅलिटेक्नीक येथे प्रजासत्ताक दिन साजरा
Next post सोमय्या पाॅलिटेक्नीक येथे संत गाडगे महाराज जयंती साजरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Chief Editor

Shri. P. S. Ambatkar

Chief Editor - Daily Deshanayak News