
घुग्घुस कांग्रेस तर्फे कॉन्वेंट शाळेना निवेदन
चंद्रपूर :- येथील कॉन्वेंट शाळे तर्फे एडमिशन फी करीता पालकावर दबाव टाकल्या जात असुन शाळे तर्फे दिलेल्या तारखेच्या आतच फी भरण्याची सख्ती करण्यात येत असल्याची तक्रार काही पालकानी घुग्घुस कांग्रेस कमेटीचे अध्यक्ष राजुरेड्डी यांना केली असता घुग्घुस कांग्रेस कमेटी तर्फे घुग्घुस येथील सर्व खाजगी कॉन्वेंट शाळेला निवेदन देवून त्यांना एडमिशन फी व अन्य फी करीता पालकाना वेठीस धरु नये चालू सत्रातील तीन महिन्याची फी आकारणी करण्यात येवू नये.
व एडमिशन व अन्य फी करीता सहा महीने वेळ देण्यात यावा पालकांच्या क्षमते नुसार त्यांना सुविधा देण्यात यावे.
मागील दोन महिन्यापासुन शुरू असलेल्या ताळेबंदी व संचारबंदी मुळे नागरिकांचा आर्थिक कणा मोडला असून आजघडिला शालेय फी भरण्याची ऐपत छोटे व्यापारी व मंजूर वर्गाची नाही करीता जिल्ह्यातील खाजगी कान्वेंट शाळेना नागरिकांना त्यांच्या सवलती प्रमाणे फी भरण्याची सूट द्यावी व या संकट समयी मानवीय दृष्टिकोनातून सहकार्य करावा अर्शी विनंती
करण्यात आली.
यासोबतच चंद्रपुर जिल्ह्यातील खाजगी कॉन्वेन्ट शाळे तर्फे नागरिकांना त्रास देण्यात येवू नये या करीता पालकमंत्री विजय भाऊ वड्डेटीवार यांना करण्यात आले.
याप्रसंगी कामगार नेता सैय्यद अनवर हे उपस्थित होते.