महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळाद्वारे संचालित सोमय्या इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी वडगाव, चंद्रपूर येथे चे आयोजन तीन दिवसीय स्मरणशक्ती चे विधार्थ्यांसाठी आज दि. ८, ९ व १० डिसेंबर २०२५ रोजी ”ध्यान चिंतन मनन (मेडिटेशन)” सेमिनार आयोजित करण्यात आले होते या सेमिनारला प्रमुख पाहुणे मा. जयबहादूर सिंग, सुषमा सिंग, सविता गुंडांवर, उपस्थित होते.
सोमय्या इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी चंद्रपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘Meditation Heartfulness Seminar २०२५’ या तीन दिवसीय सेमिनारला विद्यार्थ्याकडून उत्साहपूर्ण प्रतिसाद मिळाला. मानसिक स्वास्थ्य, एकाग्रता, ताण-तणाव कमी करणे आणि सर्वांगीण व्यक्तिमत्व विकास या विषयांवर उपयुक्त मार्गदर्शन देण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात पहिल्या दिवशी मा. सुषमा सिंग यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनाने झाली. त्यांनी ध्यानाचे वैज्ञानिक पैलू, मेंदूवर होणारा सकारात्मक परिणाम आणि दैनंदिन जीवनात साध्या पद्धतीने ध्यान कसे समाविष्ट करावे याबाबत माहिती दिली.
दुसऱ्या दिवशी मानसिक ताण तणाव दूर करणे, श्वास घेण्याच्या पद्धती, माइंडफुलनेस व्यायाम आणि मार्गदर्शित ध्यान यांचा समावेश असलेल्या प्रात्यक्षिक सत्रांचे आयोजन करण्यात आले. ध्यानामुळे भावनिक संतुलनात कसा फरक पडतो, याबाबत सकारात्मक प्रतिक्रिया मिळाले .
शेवटच्या दिवशी “दैनंदिन जीवनासाठी ध्यान (मेडिटेशन)” या विषयावर खुली चर्चा झाली. ताणतणावपूर्ण , विद्यार्थी जीवन, घरगुती जबाबदाऱ्या आणि तंत्रज्ञानाच्या वापरामुळे वाढणारी मानसिक थकावट यावर उपाय म्हणून ध्यानाचे (मेडिटेशन) महत्व सांगण्यात आले.
या कार्यशाळेला संस्थेचे अध्यक्ष पी. एस .आंबटकर, पियुष पी.आंबटकर, अंकिता पी.आंबटकर, प्राचार्य डॉ. हिरेंद्र हजारे सर, सर्व विभाग प्रमुख व शिक्षक , शिक्षकेत्तर कर्मचारी व विध्यार्थां उपस्थित होते. .
