
महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित सोमय्या पॉलीटेक्नीक कॉलेज वडगाव चंद्रपूर तर्फ राष्ट्रीय सेवा योजना (NSS) दोन दिवसीय उपक्रम राबविण्यात आले.
ह्या कार्यक्रमात प्रा.बोबडे सर,प्रा.सुत्राळे सर,प्रा.बलमवार मॅडम,ठाकरे सर,नॅन्सी मॅडम,अक्षता मॅडम तसेच प्रमुख पाहुणे ऊस गावातील सरपंच सौ.निविता धनंजय ठाकरे,मेश्राम मॅडम,बोडोळे मॅडम उपस्थित होते.
तसेच प्रा. मनीषा हरणे यांनी ग्रामीण भागातील लोकांना आणि विद्यार्थ्यांना राष्ट्रीय सेवा योजना (NSS) माहिती देत असताना ”राष्ट्रीय सेवा योजना (NSS)” ही भारत सरकारची एक स्वयंसेवी योजना आहे, जी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी, सामाजिक जाणीव निर्माण करण्यासाठी आणि सामुदायिक सेवेतून ‘सेवेतून शिक्षण’ (Education Through Service) देण्याच्या उद्देशाने १९६९ मध्ये सुरू झाली, ज्याचा मुख्य ध्येय विद्यार्थ्यांमध्ये ‘मी नाही, तर तू’ (Not Me, But You) या भावनेतून समाजसेवा करणे आहे. महात्मा गांधींच्या आदर्शांवर आधारित या योजनेत स्वच्छता, ग्रामीण विकास, साक्षरता यांसारख्या कामांचा समावेश असतो, ज्यामुळे ग्रामीण भागातील लोकांना आणि विद्यार्थ्यांना सामाजिक बांधिलकी आणि राष्ट्रीय एकात्मतेची भावना मिळते,तसेच ग्रामीण भागातील स्वच्छता, वृक्षरोपंन ,आरोग्य आणि शिक्षणातील जागरूकता ,शिक्षणात मदत करणे , स्वच्छ भारत अभियान असे विविध उपक्रम राबविण्यात आले,
ह्या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाकरिता संस्थेतील प्राचार्य जमीर शेख,उपप्राचार्य अनिल खुजे ,सर्व विभागातील विभाग प्रमुख आणि सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थांनी प्रयत्न केला, सूत्र संचालन प्रा. नौशाद सर यांनी केले.
