
Read Time:46 Second
सरसकट कापूस खरेदी करावी ही शेतकऱ्यांची मागणी
यवतमाळ : जिल्ह्यात हजारो शेतकऱ्यांचा कापूस विक्री व्हायचा आहे आणि पणन महासंघाची खरेदी धीम्या गतीने सुरू आहे. अशावेळी खरीप हंगाम अगदी समोर आहे. आता पुढच्या हंगामाचे नियोजन कसे करायचे असा प्रश्न शेतकऱ्यांचा समोर आहे .
आता शेतकऱ्यांचा कापूस शासनाने सरसकट खरेदी करावा अशी मागणी घेऊन शेतकऱ्यांनी आज यवतमाळ जिल्ह्यातील इचोरी येथे कापसाची होळी करून सर्व शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करावा अशी मागणी केली आहे.