
महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळाद्वारे संचालित सोमय्या इन्स्टिटयूट ऑफ टेकनॉलॉजिचे विद्यार्थी सोहंम पांडे AIMLद्वितीय वर्ष यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेकनिकल युनिव्हर्सिटी लोनोर रायगड तर्फे जे.डी. इंजिनीरिंग कॉलेज नागपूर येथे बुद्धिबळ स्पर्धा २०२५-२६ आयोजित करण्यात आली. त्यात नागपूर झोन चे सर्व विद्यार्थी उपस्थित होते सोहंम पांडे यांनी सोमय्या इन्स्टिटयूट ऑफ टेकनॉलॉजिचे प्रतिनिधित्व करून बुद्धिबळ स्पर्धेत बुद्धीची प्रतिभा चमकदार कामगिरी करीत द्वितीय क्रमांक पटकविला आहे.
या स्पेर्धेत सोहंम पांडे यांनी बुद्धिबळ स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावून विद्यापीठ स्तरीय स्पेर्धेत निवड झाल्या बद्द्दल संस्थेचे संस्थापक श्री. पी. एस. आंबटकर यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले तसेच सचिव सौ. प्रीती पी. आंबटकर, उपाध्यक्ष पियुष पी. आंबटकर, डायरेक्टर सौ. अंकिता पी. आंबटकर आणि प्राचार्य डॉ. हिरेंद्र हजारे सर व क्रीडा प्रमुख सचिन चापले सर तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी सोहंम पांडे याचे अभिनंदन केले .
