
महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा सोमय्या इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजि चंद्रपूर कॉलेजचा विध्यार्थी पैलवान पियुष पिपरे याने ऑल इंडिया कुस्ती स्पर्धेत उत्कृष्ट प्रदर्शन करून क्रीडा स्पर्धेत संस्थेचे नाव मोठे केले, हि स्पर्धा डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेक्निकल यूनिवर्सिटी रायगड (लोनेर) अंतर विभागीय कुस्ती (ग्रीको रोमन) ६० किलो वजनगट वर्ष २०२५-२०२६ सातारा येथे करण्यात आयोजीत करण्यात आली होती.
त्यामध्ये विध्यार्थी पियुष पिपरे अंतर विभागीय कुस्ती (ग्रीको रोमन) ६० किलो वजनगट मध्ये समावेश होता, याने अंतर विभागीय कुस्ती (ग्रीको रोमन) पदक मिळविला त्याबद्धल अभिनंदन केले तसेच विध्यार्थाना प्रोत्साहित करीत आपण ज्या क्षेत्रात उत्तम काम करू शकतो,ज्या क्षेत्राची आवड आहे,अशा क्षेत्राची करिअरसाठी निवड करावी,केवळ क्षेत्र आवडल्याने यश मिळत नाही तर करिअर निवडल्यानंतर ज्या क्षेत्रात अविरत निष्ठने काम केल्यास यश मिळते असे स्पष्ट केले आणि इतर विध्यार्थाना सुद्धा मार्गदर्शन केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेक्निकल यूनिवर्सिटी रायगड (लोनेर) द्वारा आयोजित अंतर विभागीय कुस्ती (ग्रीको रोमन) ६० किलो वजनगट वर्ष २०२५-२०२६ सातारा द्वारा आयोजित आंतर विभागीय कुस्ती स्पर्धेत कुस्तीगीर पैलवान पियुष पिपरे यांनी ग्रीको रोमन विभागात ६० किलो वजन गटात प्रथम क्रमांक प्राप्त करून चंदीगड पंजाब येथे होणाऱ्या आंतर विद्यापीठ राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड करण्यात आली. त्याबद्दल सोमय्या इन्स्टिटयूट ऑफ टेकनॉलॉजि चंद्रपूर कॉलेज यांनी पैलवान पियुष पिपरे यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या…
विद्याथ्याने आपले मनोगत व्यक्त करीत आपल्या यशाचे श्रेय संस्थेचे अध्यक्ष श्री. पी.एस.आंबटकर,उपाध्यक्ष श्री.पियुष आंबटकर, डायरेक्टर सौ.अंकिता पियुष आंबटकर, प्राचार्य हिरेंद्र हजारे सर याना दिले आणि क्रीडाप्रमुख सचिन चाफले सर यांनी महत्वाची भूमिका पार पाडली तसेच नवी वाटचालीसाठी शुभेच्या दिल्या, त्यांच्या या यशाबद्धल सर्वत्र कौतुक होत असून शिक्षक व शिक्षकेत्तरी कर्मचारी आणि विध्यार्थानी अभिनंदन केले.
