
महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित सोमय्या पॉलीटेक्नीक कॉलेज वडगाव चंद्रपूर येथे विद्यार्थ्यांसाठी IEI कमिटी ची स्थापना करण्यात आले.या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष श्री.पी.एस.आंबटकर, डायरेक्टर सौ.अंकिता पि.आंबटकर ,प्रमुख अतिथी डॉ.जी .के .आवारी IEI चे मेंबर ( मेकॅनिकल विभागातील ) तसेच कॉलेज चे प्राचार्य एम.झे .शेख ,उपप्राचार्य अनिल खुजे,प्रा.दीपक नागराळे,प्रा.अमित ठाकरे, प्रा.दीपक मस्के ,प्रा.किशोर बोबडे,प्रा.सोनम रेवतकर,प्रा.भारत बाबरे,मंचावर उपस्थित होते.
डॉ.जी .के .आवारी सर यांनी विद्यार्थ्यांना IEI ची माहिती दिली त्यामध्ये विद्यार्थी अध्याय म्हणजे अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये स्थापन केलेले विद्यार्थ्यांचे गट आहेत, जे अभियांत्रिकी ज्ञान, व्यावहारिक कौशल्ये आणि औद्योगिक संपर्क वाढवण्यासाठी सेमिनार, कार्यशाळा आणि औद्योगिक भेटी आयोजित करतात. हे अध्याय विद्यार्थ्यांना अभियांत्रिकीच्या क्षेत्रातील नवीन गोष्टी शिकण्यास, उद्योग-संबंधित अनुभव मिळवण्यास आणि IEI च्या राष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रमांमध्ये भाग घेण्यास मदत होतो ज्यामुळे त्यांच्या करिअरला फायदा होतो.
तसेच संगणक विभागातील नुसरत खान हिला IEI चे अध्यक्ष निवड करण्यात आले तसेच मायनींग विभागातील सचिव पद नंदिनी अहितकर निवड करून त्यांना सर्टिफिकेट देण्यात आले. तसेच हे चार्टर्ड जिनियर (इंडिया) का सर्टिफिकेट देते, जे विदेशात काम करण्यासाठी खूप उपयोगी आहे.
तसेच विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण कौशल्य आणि व्यक्तिमत्व विकसित करण्यासाठी मार्गदर्शन आणि प्रशिक्षण दिली.
