मॅकरून स्टुडन्ट अकॅडमी भद्रावती येथे विधार्थ्यांनसाठी वार्षिक स्नेहसंमेलन

महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित मॅकरून स्टुडन्ट अकॅडमी तर्फे विध्यार्थ्याचा वार्षिक महोत्सव कार्यक्रम आयोजित करण्यात आला ,याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून संस्थापक श्री. पी. एस. आंबटकर, उपाध्यक्ष श्री. पियुष आंबटकर, डायरेक्टर सौ. अंकिता पियुष आंबटकर, मॅकरून स्टूडेंट्स अकॅडमिचे प्राचार्य राजदा सिद्धकी मॅडम, आय.टी.आय.चे प्राचार्य श्री.प्रकाश पिंपळकर सर मंचावर उपस्थित होते, सर्वप्रथम दीपप्रज्वलन व सरस्वती मातेला वंदन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आले,तसेच प्रमुख पाहुण्यांचं विधार्थांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

प्रमुख पाहुण्यानी आपले मनोगत वक्त करीत आपण ज्या क्षेत्रात उत्तम काम करू शकतो,ज्या क्षेत्राची आवड आहे,अशा क्षेत्राची करिअरसाठी निवड करावी,केवळ क्षेत्र आवडल्याने यश मिळत नाही तर करिअर निवडल्यानंतर ज्या क्षेत्रात अविरत निष्ठने काम केल्यास यश मिळते .स्पर्धा परीक्षाक्षेत्र शिगेला पोहोचली आहे. पाहुण्यानी आपले मनोगत वक्त करीत ,अधिकारी बनल्यानंतर देश सेवा डोळ्यासमोर ठेऊन कार्य करण्याचे आव्हान त्यांनी उपस्थित विध्यार्थाना केले तसेच अन्य मान्यवरांनी आपली मनोगत व्यक्त केले.

तसेच त्यांनी विध्यार्थाना आपल्या कर्तव्याची जाणीव करून दिली व उज्वल भविष्यबद्धल शुभेच्या दिल्या, यशावर आणि प्रगतीवर प्रतिबिंबित करण्याची आणि भविष्यासाठी उद्दिष्टे निश्चित करण्याची ही संधी असते.शिक्षकांचे मार्गदर्शन यातून आपल्या उज्ज्वल भविष्याची सुरुवात होते. आजचा दिवस आपल्या आयुष्यातील सर्वात अविस्मरणीय दिवस आहे, मनोबल वाढवण्यासाठी, समुदायाची भावना वाढवण्यासाठी आणि ध्येयाप्रती बांधिलकी मजबूत करण्यासाठी हे एक शक्तिशाली साधन आहे.सूत्र संचालन प्रा.नवशाद सिद्धकी यांनी केले.

या कार्यक्रमाला सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Previous post सोमय्या पाॅलिटेक्नीक येथे उत्साहात शिवजयंती साजरी
Next post सोमय्या ग्रुपतर्फ शिक्षकांना शैक्षणिक भ्रम्ह्णण

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Chief Editor

Shri. P. S. Ambatkar

Chief Editor - Daily Deshanayak News