सोमय्या पॉलीटेक्नीक येथे डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांची जयंती साजरी | वाचन प्रेरणा दिवस

महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित सोमय्या पॉलीटेकनिक कॉलेज वडगाव येथे डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांची ‘’वाचन प्रेरणा दिवस ‘’ म्हणून जयंती साजरी करण्यात आली. संस्थेचे संस्थापक श्री.पी. एस. आंबटकर, सचिव सौ.प्रीती पांडुरंगजी आंबटकर ,उपाध्यक्ष श्री. पियुष आंबटकर, डायरेक्टर सौ. अंकिता पियुष आंबटकर, प्राचार्य श्री.जमीर शेख, प्राचार्य श्री. दीपक मस्के , रजिस्टर श्री.बिसन सर यांची उपस्तित होते.

सर्व प्रथम डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली, यावेळी प्राचार्य श्री.जमीर शेख सर यांनी डॉ.अब्दुल कलाम यांच्या विषयी विधार्थांनाअनमोल मार्गदर्शन करीत असताना हे एक भारतीय शास्त्रज्ञ होते,माझी राष्ट्रपती स्व.डॉ.अब्दुल कलाम यांच्या स्मुर्ती जतन करण्याच्या उद्धेशानी यांच्या जन्मदिवस वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात यावे, तसेच त्यांचे पूर्ण नाव अब्दुल पाकीर जैन्नुलाब्दीन होते .

तसेच त्यांनी २००२ ते २००७ या काळात भारताचे ११ वे राष्ट्रपती होते,त्यांनी शास्त्रज्ञ आणि विज्ञान प्रशासक म्हणून प्रामुख्याने संरक्षण ,संशोधन,विकास संस्था आणि भारतीय अंतराळ संशोधन संस्था,येथे काम केले,अशा प्रकारे बॉलिस्टिक क्षेपणास्त्र आणि प्रक्षेपण वाहन तंत्रज्ञानांच्या विकासावर केलेल्या कामामुळे ते भारताचे मिसाइल मॅन म्हणून ओळखले जाऊ लागले,शिक्षण,लेखन आणि सार्वजनिक सेवेच्या नागरी जीवनात परतले,भारताचा सर्वच्च नागरी सन्मान असलेल्या भारतरत्न अशे अनेक प्रतिष्ठित पुरस्कार प्राप्त केले. या कार्यक्रमाला सर्व विभाग प्रमुख आणि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्तित होते .

Previous post सोमय्या पॉलीटेक्नीक येथे विध्यार्थ्यांसाठी गेस्ट लेक्चर्स
Next post सोमय्या पॉलीटेक्नीकच्या विधार्थ्यांनी ग्रामीण कौशल्य विकास केंद्राच्या उद्धघाटन सोहळ्यात सहभाग

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Chief Editor

Shri. P. S. Ambatkar

Chief Editor - Daily Deshanayak News