
पाणी हे जीवन आहे.दरवर्षी २२ मार्च रोजी जागतिक जल दिवस साजरा केला जातो.पाणी हे नैसर्गिक स्तोत्र असले तरी दरवर्षी वापरण्यायोग्य पाण्याचे दुर्मिळता जाणवत आहे,त्यामुळे योग्य पाण्याचे नियोजन करणे हि काळाची गरज आहे.आज वापरण्यायोग्य पाणी दूषित प्रमाण वाढले असून पाणी वापर जल जागृतीकरीत पुढाकार घेण्याचे आवाहन सोमय्या पॉलीटेक्निक चे संस्थापक श्री.पी.एस.आंबटकर यांनी विध्यार्थाना व शिक्षकाना केले.
वाढत्या औधोगीकरणामुळे ,सर्व नैसर्गिक स्तोत्राचा अतिवापर आणि शोषणामुळे मानवी जीवनाला पाण्याची तीव्र टंचाई सारख्या काही भीषण परिस्थितीचा सामना करावा लागत आहे.पाणी हा सर्व सजीवांचा एक महत्वाचा घटक आहे.पृथ्वीवरील जलस्रोत टिकवून ठेवण्यासाठी आणि लोकांना जलसंकटाची जाणीव करून देणे गरजेचे आहे.पाण्याशिवाय आपले अस्तित्व धोक्यात येऊ शकते.
हा दिवस साजरा करण्यामागचा उद्धेश सर्वाना माहीतच आहे,असे एकही काम नाही जे करण्यासाठी पाण्याची गरज नाही.पाण्याचे महत्व समजावून सांगण्यासाठी जागतिक जल दिनाचे कार्यक्रमाला संस्थेचे सचिव सौ. प्रीती पांडुरंगजी आंबटकर ,उपाध्यक्ष श्री. पियुष आंबटकर, सौ. अंकिता पियुष आंबटकर, प्राचार्य श्री.जमीर शेख सर, रजिस्टर श्री. बिसेन सर यांची उपस्थित होते.
हया कार्यक्रमाकरीता संस्थेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थीत होते.