महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित सोमय्या पॉलीटेक्नीक कॉलेज वडगाव येथे नवं वर्षाचे स्वागत करण्यात आले, संस्थेचे संस्थापक श्री. पी. एस. आंबटकर, सचिव सौ.प्रीती पांडुरंगजी आंबटकर, उपाध्यक्ष श्री. पियुष आंबटकर, सौ. अंकिता पियुष आंबटकर, प्राचार्य श्री.जमीर शेख सर, रजिस्टर श्री.बिसेन सर मंचावर उपस्थित होते, संस्थेचे संस्थापक श्री. पी. एस. आंबटकर यांच्या हस्ते सर्व प्रथम दीप प्रज्वलित करून सरस्वती मातेला वंदन करून गुढी उभारून नवीन वर्षाचे स्वागत केले .
संस्थेचे अध्यक्ष भाषण देत असताना नवीन वर्षाचे स्वागत करीत सर्वाना शुभेच्छा दिल्या. गुढी पडावा म्हणजे हिंदू नववर्षाचा पहिला दिवस,हा सण चैत्र शुद्ध प्रतिपदेला साजरा करण्यात येतो. महाराष्ट्रत मोठया उत्साहाने सण साजरा केला जातो. या दिवशी गुढी उभारली जाते, या गुढीला विजयाचे व समृद्धीचे प्रतीक मानले जाते.
सर्वाना आनंदी आणि समृद्धी ची नवीन सकाळ, नवीन अशा, यश, नवीन योजना, तसेच नवीन वर्ष हे सुखमय जाओ, नव्या उमेदीने झेप घेऊन नवं वर्षाचे स्वागत केले, शिक्षकांनी नव्या संकल्पना, आपले ध्येय पूर्ण करण्याची नव्या जुन्या आठवणी व विचार मांडले.
हया कार्यक्रमाकरीता संस्थेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थीत होते.