महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित सोमय्या पॉलीटेक्निक कॉलेज वडगाव येथे जागतिक वन दिन साजरा करण्यात आला. संस्थेचे संस्थापक श्री. पी. एस. आंबटकर, सचिव सौ.प्रीती पांडुरंगजी आंबटकर ,उपाध्यक्ष श्री. पियुष आंबटकर, सौ. अंकिता पियुष आंबटकर, प्राचार्य श्री.जमीर शेख सर, रजिस्टर श्री.बिसेन सर यांची उपस्तित होती , कार्यक्रमाची सुरवात सर्वप्रथम वृक्षरोपण करून करण्यात आली.
”झाडे लावा आणि झाडे जगवा
सुजल,निर्मल भविष्य घडावा’’
पर्यावरण विषयक कार्यक्रमांना पाठबळ देण्यासाठी व पर्यावरण संवर्धनाच्या वचन बद्धतेला नवी प्रेरणा देण्यासाठी सोमय्या पॉलीटेक्निक येथे वन दिवस साजरा करण्यात आला. तसेच विध्यार्थाना आंतरराष्ट्रीय वन दिवसाचे औचित्य साधून शपथ घेतली.आपल्या विकासाच्या आणि सौदर्याच्या अजब कल्पनाच पृथ्वीच्या मुळावर उठल्या आहेत.आज आपल्या डोळ्यांना सुंदर दिसणार वास्तव्य पृथ्वीच्या आणि येणाऱ्या जीवनावर उठणारआहे,या दिवशी वृक्षरोपन तसेच पर्यावणाविषय उपक्रम व कार्यक्रमाचे आयोजन करून पर्यावरण रक्षणाचे म्हणजेच वसुंधरेच्या रक्षणाची शपथ घेतली जाते. २१ मार्च हा आंतरराष्ट्रीय वन दिन म्हणून घोषित केला आणि सर्व प्रकारच्या जंगलांच्या महत्वाविषयी जागरूकता निर्माण केली.तसेच पृथ्वीवरील सर्व जीवसृष्टी कोणत्या ना कोणत्या प्रकारे जंगलाच्या अस्तित्वाशी संबधित आहे.
” धरतीमाता माय आपली
रक्षण तिचे करू चला
झाडे लावू,प्लस्टिक बंदी
थोडे नियम पाळू चला ”
पर्यावरणाची काळजी,जतन, संरक्षण केले पाहिजे,निसर्गातील जल, पृथ्वी,वायु,अग्नी,आकाश,अशा पंचतत्वावर आधारित निसर्गाचे संरक्षण करणे महत्वाचे आहे.
हया कार्यक्रमाकरीता संस्थेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थीत होते.