सोमय्या पाॅलिटेक्नीक येथे संत गाडगे महाराज जयंती साजरी

 

महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ चंद्रपूर व्दारा संचालित सोमय्या पाॅलिटेक्नीक येथे संत गाडगे महाराज जयंती साजरी करण्यात आली. सर्व प्रथम संत गाडगे महाराज हयांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून व दिप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली, हया कार्यक्रमाकरीता संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. पी .एस.. आंबटकर, उपाध्यक्ष श्री. पियुष आंबटकर, प्राचार्य जमीर शेख, रजिस्टार श्री. राजेश बिसन सर, उपस्थीत होते
संत गाडगे महाराजविषयी माहिती देत असतांना. ग्रामीण भागात स्वच्छतेची शिकवणीतून समाज सुधारणा करणारे संत म्हणजे गाडगेबाबा होय, जन्म अमरावती जिल्हयातील शेणगांव येथे 23 फेब्रूवारी 1876 ला झाला, त्यांचे पूर्ण नांव डेबूजी झिंगराजी जानोरकर होते. अवघ्या समाजाचा संसार सुधारण्यासाठी ते घराबाहेर पडले. सार्वजनिक हिताची कामे ‘सर्व जनांनी, एकवटून केली पाहिजेत हा धडा त्यांनी मिटल्या तांेडी गावक-यांना शिकविला.सतत एक खराटा जवळ बाळगायचे.
गाडगे महाराज हे ईश्वर कशात आहे ही नेमकी जाणीव असलेले संत आणि गोरगरीब, दीनदलित यांचा ऐहिक व आध्यात्मिक विकास होण्यासाठी अज्ञान, अंधश्रध्दा, अस्वच्छता यांचे उच्चाटन करण्यासाठी तळमळीने कार्य करणारे होते. तीर्थी धोंडाप्राणी देव रोकडा सज्जनी“ असे सांगत दीन, दुबळे, अनाथ, अपंगांची सेवा करणारे थोर संत म्हणजे गाडगेबाबा.” देवळात जाऊ नका,“अशी शिकवण आयुष्यभर त्यांनी लोकांना दिली, माणसात देव शोधणा-या या संताने लोकांनी दिलेल्या देणग्यांतील पैशातून रंजल्या-गांजल्या, अनाथ लोकांसाठी महाराष्ट्रात ठिकठिकाणी धर्मशाळा, अनाथालये, आश्रम, व विद्यालये सुरू केली. रंजले-गांजले, दीन-दुबळे, अपंग-अनाथ हेच त्यांचे देव. या देवांतच गाडगेबाबा अधिक रमत असत, डोक्यात झिंज्या, त्यावर खापराच्या तुकडयाची टोपी, एका कानात कवडी,तर दुस-या कानात फुटक्या बांगडीची काच,एका हातात झाडू,दुस-या हातात मडके असा त्यांचा वेश होता

गाडगेबाबा म्हणून ओळखले जाणारे महाराष्ट्र राज्यातील एक कीर्तनकार, संत आणि समाजसुधारक होते. त्यांनी स्वेच्छेने गरीब रहाणी स्वीकारली होती. ते सामाजिक न्याय देण्यासाठी विविध गावांना भटकत असत. गाडगे महाराजांची सामाजीक न्याय सुधारणा आणि स्वच्छता या विषयांत जास्त रूची होती. विसाव्या शताकातील समाजसुधारक आंदोलनांमध्ये ज्या महापुरूषांचा सहभाग आहे, त्यांपैकी एक महत्वाचे नांव गाडगे बाबा यांचे आहे.

हया कार्यक्रमाला उपस्थित असणारे संस्थेचे विभाग प्रमुख, तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.

Previous post सोमय्या पाॅलिटेक्नीक येथे वसंत पंचमी व सरस्वती पूजन
Next post सोमय्या पाॅलिटेक्नीक येथे 28 फेब्रुवारी 2021 ला रोजगार मेळावा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Chief Editor

Shri. P. S. Ambatkar

Chief Editor - Daily Deshanayak News