सोमय्या आयुर्वेदिक मेडीकल कॉलेज आणि हॉस्पिटल भद्रावती येथे मातृदिन साजरा

सोमय्या आयुर्वेदिक मेडीकल कॉलेज आणि हॉस्पिटल भद्रावती येथे मातृदिन साजरा
महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित सोमय्या आयुर्वेदिक मेडीकल कॉलेज आणि हॉस्पिटल येथे मातृदिन साजरा करण्यात आला ,संस्थेचे संस्थापक श्री. पी. एस. आंबटकर, प्राचार्य राजदा सिद्धकी, प्राचार्य डॉ.शीतल कोलपाकवार (कापर्तीवार) उपस्थित होते.
प्राचार्य डॉ.शीतल कोलपाकवार यांनी मातृदिन विषयी संबोधीत असताना आईप्रती आदर, प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त करणे, तसेच मुलांच्या आनंदासाठी आयुष्य वेचणाऱ्या आईचे कौतुक करणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे.मातांच्या सन्मानार्थ विशेष दिवस असावा या उद्देशाने केली. १९१४ मध्ये अमेरिकेचे अध्यक्ष वूड्रो विल्सन यांनी हा दिवस अधिकृतरित्या साजरा करण्याची घोषणा केली. आई म्हणजे निस्वार्थ प्रेमाचा झरा. आपल्या रोजच्या व्यस्त जीवनात आपण अनेकदा आईचे आभार मानण्यास विसरतो. मदर्स डे हा आपल्याला आपल्या भावना व्यक्त करण्याची आणि आईला ती किती खास आहे, याची जाणीव करून देण्याची संधी देतो.आणि सगळ्यांना मातृदिनाच्या खूप खूप शुभेच्छा दिल्या.
तसेच मातृदिन निमित्य सर्व डॉ.महिलांचा,प्राध्यपकवर्ग आणि शिक्षक व शिक्षकेत्तर महिला कर्मचाऱ्यांचा सत्कार करून त्याना पुष्पगुछ आणि उपहार देऊन गौरविण्यात आले.

Previous post सोमय्या ग्रुप येथे महाराष्ट्र दिवस उत्सहात साजरा

Chief Editor

Shri. P. S. Ambatkar

Chief Editor - Daily Deshanayak News