
चंद्रपूर : चिमूर तालुक्यातील नेरी येथील सुशिल लोखंडे वय २३ वर्ष स्वतःच्या मालकीच्या सैन्ट्रो कार एम एच ३१ सी एन १५५० ने तिन मित्रांसोबत नेरी वरून सावरगावकडे जात होता .दिड किलोमिटर अंतरावर चालकाचा नियंत्रण सुटला व त्यामूळे कारने रस्त्यालगत असलेल्या शेतात पलटी मारली .हि घटना दुपारी १ .०० च्या दरम्यानची असुन या अपघातात गंभीर जखमी झाल्याने सुशीलचा जागेवरच मृत्यु झाला .
चिमूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या नेरी येथील सुशील लोखंडे हा युवक त्याच्या तिन मित्रांसोबत सावरगावला स्वतःच्या कारणे नेरी वरुण सावरगावला जात होता .सुशील कार चालकाच्या बाजुला बसला होता .स्मशानभुमी जवळ नेरी वरूण दिड कीलोमिटर अंतरावर असताना कार चालकाचे नियत्रंन सुटुन कार रस्त्या लगत असलेल्या शेतात पलटी झाली त्यामध्ये कार मालक सुशील लोखंडे हा जबर जखमी झाला . त्याला प्राथमीक आरोग्य केन्द्र नेरी येथे आणन्यात आले तिथे वैद्यकिय अधिकारी डॉ .कोवासे यानी त्याला मृत घोषीत केले .
घटनेची माहीती नेरी येथील पोलीस चौकीला देण्यात आली .पोलीस घटनास्थळी पोहचुन पंचणामा करून शवविच्छेदनासाठी शव उप जिल्हा रुग्णालय चिमुर येथे पाठवीन्यात आले . सुशील चे मित्र पोलीस कार्यवाहीच्या भीतीने फरार झाले असुन पुढील तपास चिमुर पोलीस स्टेशनचे ठाणेदार स्वप्नील धुळे यांच्या मार्गदर्शनात नेरी पोलीस चौकीचे पोलीस करत आहेत .