महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित सोमय्या ग्रुप येथे २०२५ मॅट्रीकोला आणि फ्रेशर्स पार्टीचे प्रियदर्शनी इंदीरा गांधी सभागृह चंद्रपूर येथे आयोजित करण्यात आले , या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी संस्थेचे अध्यक्ष श्री.पी.एस आंबटकर, प्राचार्य राजदा सिद्दकी, प्राचार्य जमीर शेख, उपप्राचार्य अनिल खुजे सर , प्राचार्य मोजस सर, प्राचार्य जोगे सर , श्री . नागराळे सर , प्रा.ठाकरे, प्रा.बलमवार मॅडम ,रेवतकर मॅडम,कोटकर मॅडम,जेणेकर मॅडम,प्रा.मस्के सर,प्रा.बोबडे सर , प्रा.बाबरे,प्रा.केटी सर , रजिस्ट्रार राजेश बिसन सर मंचावर उपस्थित होते, सर्वप्रथम प्रमुख अतिथी संस्थेचे अध्यक्ष श्री.पी.एस आंबटकर यांचा हस्ते दीप प्रज्वलन आणि नटराजचा मूर्तीला माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
कार्यक्रमाची प्रास्ताविक प्राचार्य जमीर शेख ह्यांनी केल्यानंतर संस्था अध्यक्ष श्री.पी.एस आंबटकर ह्यांनी विधार्थांशी संवाद साधला त्यामध्ये विधार्थानी योग्य पद्धतीने आणि सातत्याने अभ्यास करावा व जेष्ठीत जास्त गुण मिळवून विधार्थानी यशस्वी व्हावे त्याकरिता विधार्थानी संस्थेतर्फ सर्व प्रकारचे मार्गदर्शन करायचे अभिवचन दिले तसेच जे विधार्थी गुणानुक्रमे उत्कृष्ट गुण प्राप्त करतील त्यांना संस्थे तर्फ लॅपटॉप आणि टॅब देण्यात येईल असे घोषित केले. तसेच टॉपर विध्यार्थाचे सत्कार करण्यात आले , समयरा मेश्राम , रतन गौरकार , प्रांजली इटनकर , ख़ुशी पासवान , श्रुती गौतरे , निशा नाकोडे,हर्षदा जीवने, प्रीती देरकर, नंदिनी रावला,अर्पिता वांढरे , नंदिनी अहिरकर, तनुजा जाधव , नुसरत खान ,सर्वद्न्य नवलकर , सम्रप मानकर , वैष्णवी चिन्नाला , शाह शाहिद जावेद, प्रांशू चोपणे , अलिशा शोमे , समायरा मेश्राम ,प्रिया सिडाम ,मुस्कान कुरेशी, क्रुष्णाली रणदिवे , तेजस्विनी गुरनुले , तृषान्त नेऊलकर , प्रणाली गेडाम , कुरेशी शिफा झुबेर अहमद , प्रज्ञा ढोके, सालेहीन खान , आदित्य येनगुलवार , सानिया आसुटकर, साक्शी येरणे सर्टिफिकेट आणि मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले .
त्याचबरोबर मॅट्रीकोला २०२५ च्या आयोजनामध्ये विधार्थां करीता सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ,सोमय्या पॉलीटेक्नीक कॉलेज,सोमय्या आय टी.आय. कॉलेज तसेच डीफार्म ,विधार्थांचा सहभाग नोंदविला होता. फॅशन शो,डान्स शो,रॅम वॉक,गायन स्पर्धा घेण्यात आले, त्यामध्ये सोलोडान्समध्ये प्रथम क्रमांक सानिया आसुटकर सिविल विभागातील, द्वितीय क्रंमांक दिशा उराडे , तृतीय क्रमांक हर्षता ग्रुप याना मिळाला.
सीगिंगमध्ये प्रथम क्रमांक सारिका लांडगे ग्रुप डि फार्मसी, द्वितीय क्रमांक गौतमी साखरकर संगणक विभागातील , तृतीय क्रमांक खुशाल मांडरे सिविल विभागातील, त्याचबरोबर ग्रुप डान्समध्ये प्रथम क्रमांक लक्षिता आणि ग्रुप dmlt , द्वितीय क्रमांक ग्रुप देवी डान्स इलेक्ट्रिकल ग्रुप , तृतीय क्रमांक नंदिनी आणि ग्रुप यांचा आला .
सोमय्या विनर २०२५ मिसेस आचल सोनवले आणि सोमय्या मिस्टर मिलिंद सरकटे, तसेच सोमय्या रनरप मिसेस देविका मंडल आणि सोमय्या मिस्टर रनरप जीत कापते , डि फार्मसी मधील विधार्थी सोमय्या प्रेशर विनर मिसेस श्रेया पंडित आणि मिस्टर फ्रेशर निहाल चौधरी, प्राव्हेट आय टी आय मधील मिस्टर फ्रेशर साहिल पिंलकर यांनी पटकाविला.
तसेच प्रमुख पाहुण्यानी आपले मनोगत वक्त करीत आपण ज्या क्षेत्रात उत्तम काम करू शकतो,ज्या क्षेत्राची आवड आहे,अशा क्षेत्राची करिअरसाठी निवड करावी,केवळ क्षेत्र आवडल्याने यश मिळत नाही तर करिअर निवडल्यानंतर ज्या क्षेत्रात अविरत निष्ठने काम केल्यास यश मिळते. . पाहुण्यानी आपले मनोगत वक्त करीत ,अधिकारी बनल्यानंतर देश सेवा डोळ्यासमोर ठेऊन कार्य करण्याचे आव्हान त्यांनी उपस्थित विध्यार्थाना केले तसेच अन्य मान्यवरांनी आपली मनोगत व्यक्त केले, आजचा दिवस आपल्या आयुष्यातील सर्वात अविस्मरणीय दिवस आहे, मनोबल वाढवण्यासाठी, समुदायाची भावना वाढवण्यासाठी आणि ध्येयाप्रती बांधिलकी मजबूत करण्यासाठी हे एक शक्तिशाली साधन आहे.
सूत्र संचालन विधार्थी हर्षदा जीवने,गौतमी साखरकर आणि प्रा. नौशाद सर यांनी केले.