रमजानच्या उपवासाच्या काळात रोज देत आहे सेवा

◆ रोज शेकडो स्थलांतरीत लोकांना जेवण व नाश्ताची व्यवस्था.

◆ साई कृपा हॉटेल मालकाचा सेवा परमधर्मचा संदेश.

अमरावती : (तिवसा) कोरोनाच्या या काळात सर्व जण आपल्या पद्धतीने सामाजिक दायित्व जपत आहे, रोज हजारो नागरिक मिळेल त्या वाहनाने आपल्या गावी जात आहे मात्र हजार ते दीड हजार किलोमीटरचा प्रवास करताना वाटेत जेवणाची सोय नाही या काळात कोणी उपाशी पोटी राहू नये यासाठी अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गावर मोझरी जवळ असलेल्या हॉटेल साईकृपाचे संचालक अफसरभाई आपल्या भावा समवेत रोजा असूनही उपवासाच्या या कठीण काळातही महामार्गावरील शेकडो जणांना जेवणाची व्यवस्था करून कोरोनाच्या या युद्धात आपले सहकार्य बजावत आहे

वर्षभरापासून समस्त मुस्लिम बांधव ज्या दिवसाची आतुरतेने वाट पाहतात तो ‘रमजान ईद’ हा सण आज 25मे रोजी असून रमजान ईद या सणाासाठी मुस्लिम बांधवांमध्ये खूप उत्साह पाहायला मिळते सर्वत्र बाजार सजत या दिवसात विशेष रेलचेल पाहायला मिळते. रमजान ईद साजरी करण्याची मुस्लिम बांधवांची थाटच काही वेगळा असते महिनाभर अगदी कडक उपवास(रोजा) करुन ईदचा चंद्र पाहून हा उपवास सोडला जातो. मात्र आता कोरोना महामारी संकटामुळे मुस्लिम बांधवांच्या या महत्त्वाच्या सणावर सावट पसरले आहे. राज्यात लॉकडाऊन असल्याकारणाने विविध समाजातील सण उत्सव याला चांगलाच फटका बसत असून व्यवसायिकांना सुद्धा याचा जबर फटका बसत असल्याचे दिसून येत आहे. अश्या या
मुस्लिम धर्मात पवित्र समजल्या जाणा-या रमजानच्या महिन्यात रोजा ( उपवास ) मुस्लिम समाजातील हा उपवास मोठा कठीण व अवघड समजल्या जातो मात्र आपल्या धर्मात सांगितलेल्या नुसार रोज दान करा,उपाशी लोकांना जेवण द्या याचे पालन तिवसा तालुक्यातील मोझरीचे शेख अफसरभाई व त्यांचे भाऊ इम्रान,सलमान,जुबेर करत आहे, राष्ट्रसंताच्या कर्मभूमीत असलेले शेख कुटुंब हे नेहमीच मदतीसाठी पुढे असतात राष्ट्रसंताच्या संदेशाचे अंगीकरण करून मार्च महिन्यापासून लॉकडाऊन असल्याने रोडवरील सर्व हॉटेल बंद आहे, पण अफसरभाईने स्थानिक तहसीलदाराची परवानगी घेऊन आपल्या हॉटेल मध्ये रस्त्याने ये जा करणाऱ्यासाठी जेवणाची व्यवस्था केली आहे अगदी सॅनिटायझर बॉक्स मधून जाऊन व पूर्णपणे निवांत होऊन ते लोकांना हॉटेल मध्ये प्रवेश देऊन पोटभर जेवण देत आहे त्यामुळे रोजाच्या या काळात त्यांची समाजसेवा कौतुकाची ठरत आहे. लॉकडाऊनमुळे अनेकजन आपल्या गावी परत जाण्यासाठी धडपड करत असून हजारो किलोमीटर प्रवास करून या लोकांना थांबवून चहा, नाश्ता, जेवण त्यांची उत्तम व्यवस्था शेख कुटुंब गेल्या 25दिवसापासून करत आहे. रोज पाचशे ते सहाशे लोकांचे जेवण सकाळीच बनविण्याल्या जाते या कार्यासाठी घरातील महिला सुद्धा सेवा देत असून त्यांच्या या सेवेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

शेख कुटुंबाकडून नेहमीच मोठी समाजसेवा

राष्ट्रसंताच्या कर्मभूमीत वाढलेले अफसर भाई व त्यांचे भाऊ नेहमीच गोरगरिबांच्या मदतीसाठी समोर येत असतात एवढेच नाही तर मागील वर्षी भीषण पाणीटंचाईचा सामना मोझरी येथील नागरिकांना करावे लागला यामुळे अशा परिस्थितीत स्वतःच्या पाणी टॅंकरने मोझरी गावात पाणीपुरवठा देखील केला होता, तर तिवसा समाज कल्याण वस्तीगृहात ठेवण्यात आलेल्या सत्तर लोकांना दोन वेळ जेवण व धान्यची मदत देखील केली, तर इतरही संकटा कालीन परिस्थितीमध्ये शेख कुटुंब हे पुढेच असतात.

ईश्वराच्या प्रसन्नतेची, विशालतेची साक्ष देणारा महिना म्हणूनही या महिन्याची ओळख आहे.रोजा करून इबादत केली जाते लोककल्याणासाठी व समस्त मानवमुक्तीसाठी, राष्ट्रसंताच्या कर्मभुमीत लहानचे मोठे झालो त्यामुळे मानव सेवा हीच ईश्वर सेवा असे उद्देश मनाशी बाळगून होईल त्या सेवेत आम्ही सर्वच सहभाग घेतो.
अफसरभाई, संचालक साईकृपा हॉटेल

Previous post चालकाचे नियत्रंन सुटुन कार पलटी एकाचा जागीच मृत्यु
Next post Covid – 19 विरुद्धच्या युद्धात सहभागी व्हा जिल्हा प्रशासनाचे नागरिकांना आवाहन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Chief Editor

Shri. P. S. Ambatkar

Chief Editor - Daily Deshanayak News