
चिमूर बाजार समितीने घेतला ठराव
चंद्रपूर : चिमूर तालुक्यातील दोन जिनिग मध्ये महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादन पणन महासंघातर्फे खरेदी सुरू आहे परन्तु रोज ४०ते ५० शेतकऱ्यांना चा कापूस खरेदी सुरू असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक अडचण निर्माण झाली आहे त्यामुळे रोज शंभर शेतकऱ्यांनचा कापूस खरेदी सुरू करण्याचे आदेश देण्यात यावे असा ठराव चिमूर कृषी उत्पन्न बाजार समिती केला असून हा ठराव बाजार समितीचे सभापती माधव बिरजे यांनी मुख्यमंत्री पालकमंत्री कापूस उत्पादक महासनघाला पाठविला आहे
या वर्षी मान्सून साजे आगमन लवकर होणार असल्याचे चिन्ह दिसून येत आहे कोरोना च्या प्रादुर्भावा मूळे पणन महासंघाची खरेदी रोज ४० ते ५० शेतकऱ्यांना ची होत आहे बाजार समितीत कापूस विक्री साठी तीन हजार शेतकऱ्यांनि नोंद केल्या आहेत या तीन हजार शेतकरी यांचा कापूस खरेदी साठी दोन ते तीन महिन्याचा कालावधी लागू शकतो म्हणून शासनाने ग्रेडर ची संख्या वाढवून रोज शंभर शेतकऱ्यांनचा कापूस खरेदी करण्याचे आदेश शासनाने द्यावी अशी मागणी करण्यात येत आहे
याशिवाय धान उत्पादक शेतकऱ्यांनी फेडरेशन मध्ये धान विकण्यासाठी नोंदी केल्या आहेत परन्तु फेडरेशन ची खरेदी बंद केल्याने बाजारात कवडीमोल भावाने धान विकावे लागत असल्याने फेडरेशन ची खरेदी सुरू करण्यात यावे तसेच तूर पिकाच्या खरेदीसाठी ३१ मे पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे परन्तु आजूनहीशासनाने फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मार्फत तूर खरेदी सुरू करण्यात आली नाही त्यामुळे तूर उत्पादक शेतकरी सुद्धा खरेदी केंद्र सुरू होण्याची वाट पहात असून बाजार समितीत खरेदी केंद्र सुरू करण्याचे आदेश देण्यात यावे याशिवाय फेडरेशन व आदिवासी महासंघा मध्ये धान विकणाऱ्या शेतकऱ्यांना सानुग्रहय ७०० रुपयांचे अनुदान देण्यात येत आहे त्यामुळे बाजार समितीत धान विकणाऱ्या शेतकऱ्यांना तसेच तारण योजनेत धान ठेवणाऱ्या शेतकऱ्यांना सुद्धा सानुग्रहय अनुदान देण्याची मागणी करण्यात आली आहे हे सर्व ठराव बाजार समितीच्या बैठकीत सभापती माधव बिरजे यांच्या अध्यक्षतेखालीघेण्यात आले असून शासनाकडे पत्र पाठविण्यात आले आहे