
चंद्रपूर : अंबुजा सिमेंट लिमिटेड आणि अंबुजा सिमेंट फौंडेशनच्या वतीने कोविड – 19 अंतर्गत रुग्णाच्या सोयी करीता व्हेंटिलेटर भेट देण्यात आले. हे व्हेंटिलेटर चंद्रपुरातील ख्रिस्तानंद रुग्णालयास प्रदान करण्यात आले. जिल्हाधिकारी डॉ कुणाल खेमनार यांनी जिल्ह्यातील कंपन्यांना मदतीचे आवाहन केले होते या आवाहनाला प्रतिसाद देत अंबुजा सिमेंट लिमिटेड आणि अंबुजा सिमेंट फौंडेशनच्या वतीने व्हेंटिलेटर दिले ते चंद्रपुरातील ख्रिस्तानंद रुग्णालयात देण्यात आले. या प्रसंगी जिल्हाधिकारी डॉ कुणाल खेमनार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ राठोड, ख्रिस्तानंद रूग्णालयाचे प्रमुख फादर जोसेफ तर अंबुजा सिमेंट लिमिटेड चे युनीट हेड सुशीलकुमार पानेरी, कॉमर्शिअल हेड संजीवा राव आणि अंबुजा सिमेंट फौंडेशनचे प्रोग्राम मॅनेजर श्रीकांत कुंभारे उपस्थित होते. दिवसेंदिवस कोरोना बाधीतांची संख्या वाढत आहे. करिता अंबुजा ने केलेले सहकार्य हे उल्लेखनीय आहे असे मत जिल्हाधिकारी डॉ कुणाल खेमनार यांनी व्यक्त केले.