डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून सोमय्या पॉलीटेक्नीक येथे शिक्षक दिन साजरा
`गुरु ब्रह्मा, गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः। गुरुः साक्षात परब्रह्म तस्मैः श्री गुरुवेः नमः
महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित सोमय्या पॉलीटेक्नीक येथे शिक्षक दिन साजरा करण्यात आला असून या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी संस्थेचे अध्यक्ष श्री.पी.एस आंबटकर, संस्थचे उपाध्यक्ष श्री. पियुष आंबटकर,डायरेक्टर सौ.अंकिता पी.आंबटकर , प्राचार्य डॉ. पद्मनाभ गाडगे,उपप्राचार्य जमीर शेख,रजिस्ट्रार श्री. बिसन सर उपस्थित होते. सर्वप्रथम कार्यक्रमाच्या सुरवातीला दिपप्रज्वल करुन डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन च्या प्रतिमेला माल्यार्पण करुन कार्यक्रमाची सुरुवात झाली,
भारतीय संस्कृतीत आईनंतर सर्वांत महत्त्वाचे स्थान आहे ते गुरुला. आई जशी मुलांवर संस्कार करते, तसा गुरु हा मुलांना घडवण्याचे, त्यांना सक्षम करण्याचे काम गुरु करतो. जीवनाला दिशा देण्यात आणि आपली जडणघडण करण्यात गुरुचा वाटा खूप मोठा असतो. त्यामुळे शिक्षक दिनाला भारतीय संस्कृतीत अधिक महत्त्व आहे. शिक्षण क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. शिक्षक दिनाच्या दिवशी विद्यार्थी आपल्या गुरुजनांबद्दल आदराची आणि कृतज्ञतेची भावना व्यक्त करतात.
त्यामध्ये विध्यार्थानी शिक्षकांचे वेशभूषण करून शिक्षकांचे दिवसभरातील वर्ग बघितले कुणी प्राचार्यांचा भार सांभाळला ,कुणी शिक्षक बनले,कुणी ग्रंथपाल बनले असे अनेक किरदार बनून शिक्षक दिन साजरा केला.त्यांना ह्यासाठी काही भेटवसून देऊन संस्थापकांनी सन्मान केला.