महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित सोमय्या पॉलीटेक्नीक येथील इलेक्ट्रिकल विभागातील विध्यार्थांना संस्था स्तरावर प्रकल्प (प्रोजेक्ट)प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते,या प्रदर्शनी मध्ये वेगवेगळा विभागाचा विधार्थानी अनेक प्रकारचे प्रोजेक्ट सादर केले,त्यामध्ये प्रथम क्रमांक व्हॉइस कंट्रोल डेस्कटॉप या मिनी प्रोजेक्टचा प्रथम क्रमांक देण्यात आले,संगणक विभागातील तुषार चिवंडे,नयन दास,प्रथमेश चव्हाण या विध्यार्थांचा समावेश होता.तसेच द्रुतीय आणि तृतीय क्रमांक अँटी स्लीप अलार्म क्रमांक देण्यात आला,यामध्ये इलेक्ट्रिकल विभागातील विनायक भोयर,रितेश रिठे,नकुल धनंजय,अर्जुन प्रसाद,राहुल बगेल,धमदीप फुलझले विध्यार्थांचा समावेश होता.
इलेक्ट्रिकल विभागातील ही अभियांत्रिकीची एक शाखा आहे जी प्रामुख्याने वीज, इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिझमशी संबंधित तंत्रज्ञानाचा अभ्यास, डिझाइन, विकास आणि वापराशी संबंधित आहे. हे एक वैविध्यपूर्ण क्षेत्र आहे ज्यामध्ये लहान मायक्रोचिपपासून ते मोठ्या पॉवर स्टेशन जनरेटरपर्यंत सर्व गोष्टींचा समावेश असू शकतो.
इलेक्ट्रिकल अभियांत्रिकीचे विद्यार्थी नेहमीच नाविन्यपूर्ण प्रकल्प शोधत असतात जे त्यांच्या कौशल्यांना आव्हान देतात आणि त्यांचे ज्ञान वाढवतात. कौशल्याच्या विविध स्तरांवरील प्रकल्प सादर करावे जसे रेझिस्टर कलर कोड वाचायला शिका.सर्किट डिझाइनची मूलभूत माहिती समजून घ्या,हँड्स-ऑन सोल्डरिंग आणि असेंब्लीचा अनुभव घ्या,व्होल्टेज, विद्युत् प्रवाह आणि प्रतिकार यांच्यातील संबंध एक्सप्लोर करा,अधिक जटिल प्रकल्पांसाठी मूलभूत कौशल्ये तयार करा.
विद्यार्थ्यांना इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स घटकांचे ज्ञान आणि सोल्डरिंग तंत्र आणि इलेक्ट्रॉनिक्स सर्किट डिझाइनसाठी पॅकेज माहिती प्रदान करणे,सर्किट डिझाइनच्या पीसीबी (प्रिंटेड सर्किट बोर्ड) वरील घटकांसह इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स सर्किट एकत्र करण्याचे ज्ञान,इलेक्ट्रॉनिक प्रणालींसाठी हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरवर आधारित लहान इलेक्ट्रॉनिक प्रकल्पाची रचना आणि विकास समावेश करावे मान्यवरांनी सांगितले.
प्रोजेक्ट कॉम्पिटीशन मध्ये विजय झालेल्या विध्यार्थांचे माननीय संस्थापक श्री.पी.एस.आंबटकर ,डायरेक्टर सौ.अंकिता आंबटकर,उपप्रचार्य श्री.जमीर शेख यांनी पुष्पगुच्या आणि प्रमाणपत्र देऊन अभिनंदन करण्यात आले .
या प्रोजेक्ट प्रदर्शनीचे आयोजन इलेक्ट्रिकल विभागातील विध्यार्थांनि तसेच प्राध्यापकवृंदानी आयोजित केला होता.या कार्यक्रमाच्या सफल आयोजन करीता प्रा.दीपक मस्के,प्रा.पूनम पवार,प्रा.धनश्री कोटकर,प्रा.अमित ठाकरे,प्रा.मिथुंन डे,प्रा.नवशाद सिद्धकी,प्रा.नेहा पाचभाई,ह्यांनी मेहनत घेतली. तसेच परीक्षक म्हणून प्रा.भारत बाबरे,आणि प्रा दीपक नगराळे सर लाभले होते.